शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आकडेवारीवरून मागासपणा ठरतो का? मराठा आरक्षण प्रकरणात उच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 06:37 IST

आकडेवारीत अनेक विसंगती असल्याचा याचिककर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठा समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास ठरविताना मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणासंदर्भात दाखल केलेल्या आकडेवारीवर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आकडेवारीवरून मागासलेपण मोजले जाऊ शकते का? तसेच किती मुले शाळेत जातात यावरून मागसलेपण ठरते का? असे प्रश्न उच्च न्यायालयाने मंगळवारच्या सुनावणीत केले.

मराठा समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेले ठरविताना शुक्रे समितीने मराठा समाजातील किती मुले शाळेत जातात आणि किती मुले उच्च शिक्षण घेतात, याची आकडेवारी सादर केली आहे. या आकडेवारीवर याचिककर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी आक्षेप घेतला. आकडेवारीत अनेक विसंगती असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनिवला यांच्या पूर्णपीठाने आकडेवारीबाबत प्रश्न उपस्थित केले.

  1. संचेती यांनी न्यायालयाला सांगितले की, मागील दहा वर्षात मागास आयोगांनी मराठा समाजसंदर्भात सादर केलेली आकडेवारी आणि शुक्रे आयोगाने सादर केलेली आकडेवारी मिळतीजुळती आहे. आधीच्या आयोगाचे अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेले नसताना शुक्रे आयोगाने सादर केलेली आकडेवारी स्वीकारून मराठा समाजाला आरक्षण देणे कितपत योग्य आहे?
  2. न्यायालयाने मंगळवारी सुनावणी तहकूब करत बुधवारी पुढील सुनावणी ठेवली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या कायद्याला उच्च न्यायालयात अनेकांनी आव्हान दिले आहे. त्याशिवाय शुक्रे आयोगाच्या स्थापनेला आणि त्यांनी सादर केलेला अहवालालाही आव्हान देण्यात आले आहे.
टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMumbai High Courtमुंबई हायकोर्टadvocateवकिल