शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

‘कॉन्स्टेबल’साठी डॉक्टर, अभियंते, वकील मैदानात, १४४९ पदांसाठी सव्वादोन लाख अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 5:57 AM

राज्य सरकार एकीकडे ‘मेक इन महाराष्ट्र’ व ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’सारख्या इव्हेंटच्या माध्यमातून लाखो रोजगारांच्या निर्मितीचा गवगवा करत असले तरी सध्या मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या निमित्ताने सुशिक्षितांच्या बेरोजगारीची दाहकता उघडकीस आली आहे.

- जमीर काझीमुंबई - राज्य सरकार एकीकडे ‘मेक इन महाराष्ट्र’ व ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’सारख्या इव्हेंटच्या माध्यमातून लाखो रोजगारांच्या निर्मितीचा गवगवा करत असले तरी सध्या मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या निमित्ताने सुशिक्षितांच्या बेरोजगारीची दाहकता उघडकीस आली आहे. अवघ्या १४४९ पदांसाठी सव्वादोन लाखांवर तरुण-तरुणी मैदानात उतरले आहेत. त्यात शेकडो अभियंते, वकील, डॉक्टरांसह ४४ हजारांवर उच्च शिक्षितांचा समावेश आहे.कॉन्स्टेबल पदासाठी केवळ बारावी उत्तीर्णची पात्रता आवश्यक असताना विविध विद्या शाखांमधील ४१ हजार पदवीधर आणि ३ हजार पदव्युत्तर बेरोजगारीच्या वणव्यातून बाहेर पडण्यासाठी आपले नशीब अजमावत आहेत. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांच्या रक्षणासाठी वकील, डॉक्टर, इंजिनीअर, एमबीए आणि एमएड झालेले युवक-युवती हातात काठी घेऊन बंदोबस्ताला उभे असल्याचे चित्र पाहावयास मिळण्याची चिन्हे आहेत.महाराष्ट्र पोलीस दलातील विविध घटकांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून शिपाई या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यात सर्वाधिक १४४९ पदे असलेल्या मुंबई पोलीस दलातील भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया ५ एप्रिलपासून सुरू झाली. त्यासाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक २ लाख २६ हजार २०५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात तरुणींची संख्या ३२ हजार २८० एवढी आहे. सरासरी एका जागेसाठी १५६ उमेदवारांत स्पर्धा होत आहे. तर महिलांच्या ४३० जागांमध्ये एका पदासाठी ७५ जणींमध्ये स्पर्धा आहे. यातील उच्चशिक्षित उमेदवार बघून अधिकारीही अचंबित झाले आहेत.बारावी हाच पात्रतेचा निकषउमेदवार उच्चशिक्षित असले तरी ही भरती निर्धारित बारावी पास या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर पारदर्शी पद्धतीने घेतली जात आहे. ८ मेपर्यंत मैदानी चाचण्या पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर मेरिट निश्चित करून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.- अर्चना त्यागी, सहआयुक्त प्रशासन वमुंबई पोलीस भरती मंडळ अध्यक्षआयपीएस अधिकाऱ्यांहून उच्चशिक्षितयंदा भरतीत उतरलेले उच्चशिक्षित उमेदवारांचे शिक्षण अनेक आयपीएस अधिकाºयांहूनही अधिक असल्याचे दिसून येत आहे. तथापि, घरच्या बिकट परिस्थितीमुळे ते नोकरीसाठी सरसावले आहेत. या उमेदवारांतून अनेक जण आयएएस व आयपीएसच्या पात्रतेचे असूनही क्लासेससाठीच्या पुरेशा आर्थिक स्थितीअभावी त्यांनी तृतीय श्रेणीतील कॉन्स्टेबल बनण्याची मानसिकता बनविली आहे.उच्चशिक्षित उमेदवारांची संख्याडॉक्टर ३बीई ३८९एमबीए १०९वकील १०बी टेक ४३एमएससी १५९एमएसडब्ल्यू ८४एमए १९७८बीबीए १६७अन्य पदवीधर ४१,१०७पदव्युत्तर पदवीधारक २९४९बारावी १,८२,१४७

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षा