शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

डॉक्टरही कायद्यावर बोलणार ; राष्ट्रीय परिषदेत होणार विचारमंथन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 17:56 IST

वैद्यकीय शिक्षण घेतानाच कायद्याचे ज्ञान देण्याबाबत डॉक्टरच पुढे सरसावले आहेत.

ठळक मुद्देडॉक्टरांचे विचारमंथन : वैद्यकीय शिक्षणात कायदा विषयाचा अंतर्भाव करावा का?पुणे शाखेतर्फे दि. ८ व ९ डिसेंबर यादिवशी मल्टिकॉन ही राष्ट्रीय परिषद घेण्यात येणार डॉक्टरांना जवळपास ४६ विविध कायदे लागूशस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचा मृत्यू होणे यांसह विविध टप्य्यांवर कायद्याचे ज्ञान आवश्यक

पुणे : वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर डॉक्टरांना पदोपदी विविध कायद्यांना सामोरे जावे लागते. स्वत:चे क्लिनिक-हॉस्पीटल काढण्यासाठी लागणाऱ्या २५ हून अधिक कायदेशीर परवानग्या, रुग्णांची माहिती सुरक्षित ठेवण्याची बंधने, विविध कायद्यांमधील तरतुदी-नियम, त्याचे उल्लंघन झाल्यास होणारी कारवाई यांसह मेस्मा तसेच विविध कायद्यांबाबत भावी डॉक्टरांना ज्ञान नसते. त्यामुळेच आता त्यांना वैद्यकीय शिक्षण घेतानाच कायद्याचे ज्ञान देण्याबाबत डॉक्टरच पुढे सरसावले आहेत. पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेमध्ये यावर विचारमंथन होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पुणे शाखेतर्फे दि. ८ व ९ डिसेंबर यादिवशी मल्टिकॉन ही राष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत माहिती, संशोधन आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नामांकित डॉक्टर्स परिषदेतील विविद परिसंवाद, चर्चासत्रांमध्ये सहभागी होणार आहेत. याच परिषदेत वैद्यकीय अभ्यासक्रमात कायदा हा विषय अंतर्भुत करावा का? या विषयावर स्वतंत्र परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूने डॉक्टरांमध्ये चर्चा होणार आहे. परिषदेच्या निमित्ताने वैद्यकीय विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान असावे, की नसावे हा मुद्दा चर्चेला आला आहे. राष्ट्रीय परिषदेमध्ये हा विषय चचेर्ला येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आयएमएला त्यावर परिसंवाद घेण्याची आवश्यकता भासणे, हा महत्वाचा मुद्दा आहे. याबाबत अनेक डॉक्टरांची मते वेगवेगळी असू शकतात. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये साडे चार वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमात दहा विषय आहेत. त्यापैकी एक विषय न्यायवैद्यक शास्त्राशी संबंधित आहे. पण विविध कायद्यांशी संंबंधित काहीच माहिती या काळात मिळत नाही. त्यामुळे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रक्टिस करणाºया डॉक्टरांना कायद्याचे ज्ञान नसते. डॉक्टरांना जवळपास ४६ विविध कायदे लागू होतात. रुग्णालय सुरू करण्यासाठी २६ कायदेशीर परवानाग्या घ्याव्या लागतात. रुग्णांशी संबंधित कागदपत्रे कशी सांभाळावीत, विविध शस्त्रक्रियांंसाठी रुग्णाची संंमती घेणे, त्यात चुक झाल्यास उदभवणाºया समस्या, फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यातील रुग्ण दाखल झाल्याच घ्यावयाची काळजी, त्याबाबतची आवश्यग कागदपत्रे, न्यायालयीन कामकाजासाठी लागणारी तयारी अशा अनेक गोष्टी डॉक्टरांना माहिती असाव्या लागतात. मागील काही वर्षात डॉक्टरांना मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशावेळी घ्यावयाची दक्षता, मेस्मा कायदा, शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचा मृत्यू होणे यांसह विविध टप्य्यांवर घ्यायच्या दक्षतेसाठी कायद्याचे ज्ञान आवश्यक असते.---------------बदलत्या परिस्थतीत डॉक्टरांना अनेक कायद्यांना सामोरे जावे लागत आहे. नवीन कायदे येऊ घातले आहेत. त्यामुळे त्याबाबत सजग असण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना किमान इंटर्नशिपच्या काळात हे ज्ञान मिळायला हवे.- डॉ. अविनाश भोेंडवे, नियोजित अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र............पीसीपीएनडीटीसारख्या कायद्याने डॉक्टरांवर अनेक बंधने आली आहेत. या कायद्यातील तरतुदी-नियमांचे पुरेपुर जाण असणे आवश्यक आहे. माहिती देण्यात आणि जतन करून ठेवण्यात थोडी चुक झाली तरी कारवाई सामोरे जावे लागते. वैद्यकीयशी संबंंधित विविध कायद्यांमध्ये आता सातत्याने सुधारणा होत आहेत. त्यामुळे याबाबत विद्यार्थी जीवनापासून माहिती होणे आवश्यक असल्याचे मत काही डॉक्टर्स व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टर