शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या डॉक्टर रखमाबाई राऊत यांना गूगलची डूडलमधून मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 09:57 IST

गूगल नेहमीचं डूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटनांना मानवंदना देत असते. गूगलने आज डूडलच्या माध्यमातून अशाच एका महान व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ठळक मुद्दे गूगल नेहमीचं डूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटनांना मानवंदना देत असते. गूगलने आज डूडलच्या माध्यमातून अशाच एका महान व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.भारतीय वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या डॉ. रूखमाबाई राऊत यांना गूगलने डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे.

मुंबई- गूगल नेहमीचं डूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटनांना मानवंदना देत असते. गूगलने आज डूडलच्या माध्यमातून अशाच एका महान व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. भारतीय वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या डॉ. रखमाबाई राऊत यांना गूगलने डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. पहिल्या महिला भारतीय डॉक्टर रखमाबाई राऊत यांची आज 153 वी जयंती असून त्यानिमित्त गूगलने खास डूडल तयार करून त्यांच्या कामाचा गौरव केला आहे.

मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत. ज्या काळात महिलांना दुय्यम स्थान दिलं जात होतं, अशा काळात रखमाबाई राऊत यांनी परिस्थितींवर मात करुन यशाचं शिखर गाठलं. रखमाबाई राऊत यांना रुक्माबाई या नावानंही ओळखलं जातं. ब्रिटीश काळातील त्या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर होत्या. त्यांनी रुग्णांची सेवा केलीच पण भारतीय महिलांच्या अधिकारासाठीही संघर्ष केला होता. बालविवाह प्रथा बंद होण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान भारतीय इतिहासात मैलाचा दगड ठरलेलं आहे.

रखमाबाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबईत झाला. रखमाबाई यांच्या आईचा बालविवाह झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी रखमाबाईंच्या आईचं म्हणजे जयंतीबाईंचं लग्न झालं होतं, 15 व्या वर्षी रखमाबाईंच्या रुपाने मुलगी झाली आणि 17 व्या वर्षी त्यांचा पती म्हणजे रखाबाईंच्या वडिलांचे निधन झालं. जयंतीबाई अवघ्या 17 वर्षाच्या असताना त्यांच्या पतीचं निधन झालं आणि रखमाबाईंच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं. पुढे जयंतीबाईंनी डॉ. सखाराम राऊत यांच्याशी दुसरं लग्न केलं.आईप्रमाणेच रखमाबाई यांचाही बालविवाह झाला. रखमाबाईंचा वयाच्या 11 व्या वर्षी दादाजी भिकाजी यांच्याशी विवाह झाला. मात्र त्यांनी माहेरी राहून वैद्यकीय शिक्षण घेतलं.

मार्च 1884 मध्ये दादाजी यांनी मुंबई हायकोर्टात वैवाहिक हक्कासाठी याचिका दाखल केली आणि रखमाबाईंनी त्यांच्यासोबत राहावं म्हणून मागणी केली. त्यावेळी, दादाजी यांच्यासोबत राहा किंवा तुरुंगात जा, असे कोर्टाने सांगितलं. अर्थात, रखमाबाईंनी तो निर्णय नाकारला आणि न्यायालयीन लढाई दिली.

पुढे हाच खटला लँडमार्क ठरला आणि 1891 मध्ये एज ऑफ कॉन्सेन्ट अॅक्ट अस्तित्त्वात आला. रखमाबाईंनी सुमारे 35 वर्षे यशस्वीरित्या वैद्यकीय सेवा दिली. त्याचसोबत, बालविवाहाच्या प्रथेविरोधात आणि महिलांच्या एकांतवासासंदर्भात लेखनही केलं. वयाच्या 91 व्या वर्षी रखमाई राऊत यांचं निधन झालं. 

टॅग्स :googleगुगल