डॉक्टर मारहाण : हल्लेखोरांना न्यायालयीन कोठडी

By Admin | Updated: April 5, 2017 05:39 IST2017-04-05T05:39:41+5:302017-04-05T05:39:41+5:30

मारहाण करून रुग्णालयात तोडफोड करणाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Doctor assault: The perpetrators are judicial custody | डॉक्टर मारहाण : हल्लेखोरांना न्यायालयीन कोठडी

डॉक्टर मारहाण : हल्लेखोरांना न्यायालयीन कोठडी


ठाणे : जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर जावेद खान यांना मारहाण करून रुग्णालयात तोडफोड करणाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आरोपीसह एकूण सहा जणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महागिरीतील मुज्जू मेमन याच्या हाताला लागल्याने त्याला बुधवारी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणले होते. त्या वेळी सलाइन लावण्यावर वाद झाला त्यातच मुज्जू आणि त्यांच्या नातेवाइकांनी डॉ. खान यांना मारहाण केली. तसेच जाताना रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुज्जूसह सहा जणांना अटक केली. त्या सर्वांना न्यायालयाने सुरुवातीला पोलीस कोठडी दिल्यानंतर आता त्या सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. धर्माधिकारी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Doctor assault: The perpetrators are judicial custody