शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Amol Kolhe vs BJP: "फक्त पैसा, प्रसिद्धीसाठीच छत्रपती शिवाजी महाराज हवेत का?"; भाजपाचा अमोल कोल्हेंना रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 11:43 IST

अमोल कोल्हेंचा शासनातर्फे होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार

Amol Kolhe vs BJP: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरी येथे १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. यात ‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. यावर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चेही आयोजन केले आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जवळपास एक लाख शिवप्रेमी सहभागी होण्याचा अंदाज आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत. तसेच शासनाने या कार्यक्रमाचे निमंत्रण स्थानिक राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना देखील दिले आहे. मात्र शासनाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावरून भाजपाने त्यांना सवाल केला आहे.

"राष्ट्रवादीचे खा अमोल कोल्हे यांनी शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. म्हणजे फक्त पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठीच यांना छत्रपती शिवाजी महाराज हवेत का? हा तर राष्ट्रवादीचा मोगल प्रेमी चेहराच पुन्हा एकदा समोर आला," असा सवाल भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. तसेच, एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी कोल्हे यांच्या भूमिकेवर टीकाही केली आहे.

अमोल कोल्हेंचा कार्यक्रमावर बहिष्कार का?

शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमाची पत्रिका मला मिळाली आहे. त्यासाठी सरकारचे आभार मानतो. मी शिवजयंती साजरी करणारच आहे. शिवभक्तांसाठी हा मोठा सण आहे. मात्र त्यात बरोबर शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेकांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर खासदार म्हणून मी बहिष्कार टाकणार आहे, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं. शिवनेरीवर साजरा होणाऱ्या शासकीय शिवजयंती खासदार अमोल कोल्हे यांनी बहिष्कार टाकणार असल्याचं सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असताना अद्याप शिवनेरीवर भगवा ध्वज कायमस्वरुपी फडकवला नाही. २०२१ पासून अनेक मंत्र्यांना आणि वरिष्ठ नेत्यांना भेटून मी किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावण्याची मागणी करत आहे. संसदेत देखील हा मुद्दा किंवा ही मागणी मी केली आहे. मात्र अद्यापही ही मागणी पू्र्ण न केल्याने ही भूमिका घेतल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा