शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही मुख्यमंत्री असताना झोपला होतात का?" 'त्या' मागणीवरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 09:32 IST

"एवढे दिवस झोपला होतात का? आपण मुख्यमंत्री होतात, तेव्हा मागणी केली आपण? मुख्यमंत्री असताना आपण काय केलं तेथे?" असा सवाल भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.  

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमधील पक्ष्याच्या निर्धार शिबिरात उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही थेट हल्ला चढवला. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खरोखरच आदर असेल, तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना दिले.  यावर, "एवढे दिवस झोपला होतात का? आपण मुख्यमंत्री होतात, तेव्हा मागणी केली आपण? मुख्यमंत्री असताना आपण काय केलं तेथे? असा सवाल भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.  

नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? -शिवजयंतीनिमित्त देशभरात सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात बोलताना, उद्धव ठाकरे म्हणाले होते, "शाहजी (अमित शाह), छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कुणी महाराष्ट्रापुरते सिमित ठेवेले, नाही नाही. शिवाजी महाराज जगाच्या काना-कोपऱ्यात पोहोचले आहेत. पण तुम्हाला त्यांच्याबद्दल खरोखरच आदर असेल, तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. इकडे येऊन केवळ मतांसाठी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' बोलू नका." 

उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर, गिरीश महाजन यांनीही पलटवार केला आहे. महाजन म्हणाले. "एवढे दिवस झोपले होते का? आपण मुख्यमंत्री होतात, तेव्हा मागणी केली आपण? मुख्यमंत्री असताना आपण काय केलं तेथे? ते ठरवतीलना, पंतप्रधान ठरवतील. शिवाजी महाराज तर आमच्यासाठी आदर्श आहेतच. तो काही प्रश्नच नाही. महाराष्ट्राला सुट्टी आहे. देशाचाही ते निर्णय घेतील. पण आपण मुख्यमंत्री असताना कधी गेलात का तेथे? कधी आपण बोललात का? कधी हा विषय काढला का? विनाकारण काही तरी, आता कामं शिल्लक राहिलेली नाहीत, म्हणून काही बोलायचे." महाजन टीव्ही ९  मराठीसोबत बोलतत होते.

 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शाह