शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

मुख्यमंत्रीपदाबाबत बोलू नका; फडणवीस-ठाकरेंच्या सूचना, युती घट्ट असल्याचा निर्वाळा  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 4:41 AM

माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवर जाऊ नका, मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजप-शिवसेना आमदारांच्या बैठकीत दिल्या.

मुंबई : भाजप-शिवसेना युतीबाबत सगळे ठरलेले आहे. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवर जाऊ नका, मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजप-शिवसेना आमदारांच्या बैठकीत दिल्या. विधानभवनात ही बैठक झाली. यावेळी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांचा सत्कार करण्यात आला.आम्ही एक आहोत आणि युती घट्ट असून विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणेच सामोरे जाऊ, अशी ग्वाही फडणवीस आणि ठाकरे यांनी दिली. ठाकरे म्हणाले की, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मी व मुख्यमंत्री यांचे युतीबाबत सगळे ठरले आहे. कुणाला काहीही बोलू द्या, युती पक्की आहे. दोन्ही पक्षांचे नेते-कार्यकर्ते लोकसभा निवडणूक एकदिलाने लढले तीच एकी विधानसभा निवडणुकीतही दाखवायची आहे, दोघांनीही सांगितले.

भाजपच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री पदावर भाजपचाच दावा असल्याचे सूचित केले होते. शिवसेनेचे संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री पदाबाबत काही विधाने केली होती. तथापि, फडणवीस आणि ठाकरे यांनी आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत बोलण्याची गरज नसल्याची तंबीच एकप्रकारे दिली.

‘बेसावध राहू नका’मुख्यमंत्री म्हणाले की, दोन्ही पक्षांचे मनोमील सर्वांनी लोकसभा निवडणूक प्रचारात अनुभवले. त्याचा मोठा फायदाही झाला. चालू अधिवेशनातही आम्ही एकत्रित आहोत. विरोधक फारच नाऊमेद आहेत पण बेसावध राहू नका, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा