शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, धनंजय मुंडे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:53 IST

मराठा समाजाने इतकी वर्षे संयम दाखवला आहे. लाखोंच्या संख्येचे मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे.

नागपूर : मराठा समाजाने इतकी वर्षे संयम दाखवला आहे. लाखोंच्या संख्येचे मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. मराठा समाजातील तरुणांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, त्यांचा अंत बघू नका. या तरुणांनी वेगळी वाट चोखाळली तर त्यांना दोष देऊ नका, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी सरकारला दिला.धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत नियम २८९ अन्वये मराठा आरक्षणावर स्थगन प्रस्ताव मांडताना सरकारकडून मराठा समाजाची कशी फसवणूक होत आहे, याची माहिती दिली. मराठा समाजाने राज्यात आतापर्यंत लाखोंच्या संख्येने ५७ मोर्चे काढलेले आहेत. बुधवारी परळी येथे मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. २३ जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी आंदोलन होणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.राज्यात मोर्चे काढूनही आरक्षण मिळत नसल्याने आता हे मोर्चे तालुका स्तरावर निघत आहेत. मूक मोर्चे झाले आता ठोक मोर्चे निघत आहेत. समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका , मराठा आरक्षण निर्णय तातडीने घ्या अशी मागणी त्यांनी केली.काँग्रेसचे सुनील दत्त म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाच्या नेत्यांनी सबका साथ, सबका विकास असे आश्वासन दिले होते. पण सरकार थापेबाज आहे. मराठा समाजाचा सरकारने अंत पाहू नये. भाई जगताप यांनीही सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक होत असल्याचा आरोप केला. नरेंद्र पाटील यांनीही मराठा समाजाला आरक्षण देण्याची आग्रही मागणी केली. विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत, आरक्षण न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सरकारची भूमिका मांडली. आरक्षणाचा विषय न्यायालयात असल्याने सरकार निर्णय घेऊ शकत नाही. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कुठे आरक्षण दिले, असा सवाल केला. यावर विरोधक अधिक आक्रमक झाले. गोंधळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकूब केले. कामकाजाला सुरुवात होताच सुनील तटकरे म्हणाले, चार वर्षात सरकारने खोटेपणाचा कळस गाठला आहे. तावडे यांनी सरकारची भूमिका मांडताना केलेले आक्षेपार्ह वक्तव्य रेकॉर्डवरून काढण्याची सूचना केली. तपासून निर्णय घेण्याचे आश्वासन सभापतींनी दिले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेmarathaमराठाNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८