सलमानच्या हिट एण्ड रनचे कार्यक्रम दाखवू नका : उच्च न्यायालय

By Admin | Updated: May 31, 2014 22:34 IST2014-05-31T21:43:05+5:302014-05-31T22:34:17+5:30

अभिनेता सलमान खानच्या हिट एण्ड रन प्रकरणाशी संबंधित कोणताही कार्यक्रम दाखवू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने वृत्त वाहिन्यांना दिले आहेत़.

Do not show Salman's hit and run program: High Court | सलमानच्या हिट एण्ड रनचे कार्यक्रम दाखवू नका : उच्च न्यायालय

सलमानच्या हिट एण्ड रनचे कार्यक्रम दाखवू नका : उच्च न्यायालय

सलमानच्या हिट एन्ड रनचे कार्यक्रम दाखवू नका
हायकोर्टाचे वृत्त वाहिन्यांना आदेश
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या हिट एण्ड रन प्रकरणाशी संबंधित कोणताही कार्यक्रम दाखवू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने वृत्त वाहिन्यांना दिले आहेत़.
काही वृत्त वाहिन्यांनी या घटनेशी निगडित कार्यक्रम प्रसारीत केले़ याविरोधात सलमानने संबंधित वृत्त वाहिन्यांविरोधात न्यायालयात दावा दाखल केला असून अशा कार्यक्रमांवर बंदी आणावी, अशी मागणी करणारा स्वतंत्र अर्जही दाखल केला आहे़
या अर्जावर सु˜ीकालीन न्या़ एस़ सी़ गुप्ते यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली़ त्यात ॲड़ गौरव जोशी यांनी सलमानच्या वतीने युक्तिवाद केला़ ते म्हणाले, अशा कार्यक्रमात तर्कविर्तक केले जातात़ याचा परिणाम खटल्यावर होतो़ तेव्हा या अपघातासंदर्भात प्रसारीत होणार्‍या कार्यक्रमांवर बंदी आणावी़ तसेच याप्रकरणी संबंधित वृत्त वाहिन्यांना देखील नोटीस पाठवण्यात आली असून त्यांचे वकील न्यायालयात हजर नसल्याचे, ॲड़ जोशी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़
त्यावर वृत्त वाहिन्यांना सलमानाने नव्याने नोटीस जारी करावी, असे आदेश देऊन न्यायालयाने वृत्त वाहिन्यांना हिट ॲण्ड रन प्रकरणी कार्यक्रम सादर करण्यास मनाई केली़ यावरील पुढील सुनावणी २ जूनला होणार आहे़
बारा वर्षांपूर्वी सलमानने भरधाव गाडी चालवत वांद्रे येथे चौघांना चिरडले़ त्यात एकाचा बळी गेला़ याप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्य वधाचा खटला सध्या सुरू आहे़

Web Title: Do not show Salman's hit and run program: High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.