जीवनसाथी शोधण्यात चूक करू नका

By Admin | Updated: March 6, 2017 03:57 IST2017-03-06T03:57:15+5:302017-03-06T03:57:15+5:30

आयुष्यात काही बनलेलो नसतो, तेव्हा आपण तणावमुक्त असतो.

Do not make a mistake in finding a spouse | जीवनसाथी शोधण्यात चूक करू नका

जीवनसाथी शोधण्यात चूक करू नका

स्रेहा पावसकर,
ठाणे- आयुष्यात काही बनलेलो नसतो, तेव्हा आपण तणावमुक्त असतो. मात्र काही बनल्यानंतरचे आयुष्य तणावपूर्ण असते. नोकरी मिळवताना ताणतणाव, मिळाल्यानंतर कामाचा ताण, प्रगती करताना वाटेत येणाऱ्या अडथळ्यांमुळे ताण येतच राहतो. संघर्ष कमी होत नाही. तो सुरूच राहतो. अशावेळी आपल्याला साथ देणारा, धीर देणारा जीवनसाथी असावा. एखाद्यावेळी नोकरी शोधताना चूक झाली तरी चालेल, पण जीवनसाथी शोधण्यात चूक करू नका, असा सल्ला मुंबई परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. मनोज शर्मा यांनी दिला.
पॉवर कपल या सत्रात त्यांच्यासमवेत पत्नी आयकर सहआयुक्त श्रद्धा शर्मा यांची मुलाखत रंगली. यूपीएससी, एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलांची खूप स्वप्ने असतात. मात्र प्रेमभावनांमध्ये गुंतलेल्या मुलांसाठी अभ्यास आणि प्रेम दोन्हीसाठी वेळ देणे कठीण असते. ठराविक काळानंतर आपल्या सोबत्याला याचे महत्त्व पटवून अभ्यासाला लागा. खरं म्हणजे प्रत्येकाने आपल्या व्यक्तिला ध्येयांवर लक्ष केंद्रित करून ते पूर्ण करण्यासाठी धीर दिला पाहिजे. ज्यांच्या घरचे, वैयक्तिक आयुष्यातील जीवन चांगले असते त्यांचे बाहेरील अर्थात नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणचे आयुष्यही चांगले राहते, असे निरीक्षण मनोज यांनी व्यक्त केले. तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी कधीच अपयशी होत नाहीत. अधिकारीपदाची नोकरी नाही मिळाली तरी ते विद्यार्थी ज्या क्षेत्रात जातात तिथे यशस्वी होतात. विशेषत: या क्षेत्रात येणाऱ्या मुलींनी जीवनसाथी निवडण्यापासून ते नोकरीची निवड असो स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिकले पाहिजे.
>महाराष्ट्र कोणाला
निराश करत नाही
मी स्वत: महाराष्ट्रीयन नाही. मात्र गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात नोकरी केली. येथे खूप चांगल्या माणसांनी बनलेला आहे. महाराष्ट्र कधीच कोणाला निराश करत नाही. फक्त आपल्यामध्ये जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहिजे. महाराष्ट्रात आलेला प्रत्येक जण यशस्वी होतो, असेही मत डॉ. मनोज शर्मा यांनी व्यक्त केले.

Web Title: Do not make a mistake in finding a spouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.