दडपशाही मार्गाने विकास नको-जितेंद्र आव्हाड

By Admin | Updated: April 13, 2017 14:09 IST2017-04-13T14:09:29+5:302017-04-13T14:09:29+5:30

समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असतांना शासन दडपशाही करीत आहे.

Do not develop through repressive way - Jitendra Awhad | दडपशाही मार्गाने विकास नको-जितेंद्र आव्हाड

दडपशाही मार्गाने विकास नको-जितेंद्र आव्हाड

ऑनलाइन लोकमत                        

सिन्नर (नाशिक), दि. 13 - समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असतांना शासन दडपशाही करीत आहे. दडपशाहीने व शेतकऱ्यांचे नुकसान करुन होणारा विकास नको असल्याचे प्रतिपादन राष्ट्रुवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांनी आज सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे भेट देवून शेतकऱ्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. समृद्धी महामार्गाची खोटी माहिती देवून अधिकारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करीत असल्याचे ते म्हणाले.  शेतकऱ्यांचा मानसिक छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आव्हाड यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांसोबत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Do not develop through repressive way - Jitendra Awhad