शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

HMPVचे टेन्शन नको, दक्षता घ्या; आरोग्य विभागाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 07:43 IST

मेटान्यूमोव्हायरसमुळे तीव्र श्वसन संसर्ग होतो. हा एक सामान्य विषाणू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सध्या चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसने (एचएमपीव्ही)  थैमान घातले आहे. महाराष्ट्राशेजारील दोन राज्यांत त्याचे तीन रुग्ण सापडले आहेत. त्याबद्दल समाज माध्यमांवरून व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे; मात्र महाराष्ट्रात या विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसल्याने नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. तसेच, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. राज्य आरोग्य विभागाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मेटान्यूमोव्हायरसमुळे तीव्र श्वसन संसर्ग होतो. हा एक सामान्य विषाणू आहे. त्याचा संसर्ग श्वसनमार्गाला होऊन सर्दीसदृश आजार होतो. हा एक हंगामी रोग आहे. तो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या प्रारंभीला फैलावतो.  या अनुषंगाने आरोग्य सेवा महासंचालनालय (डीजीएचएस) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या (एनसीडीसी, दिल्ली) संचालकांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

भीती कशाला ?

नेदरलँड्समध्ये २००१ मध्ये हा विषाणू सापडला होता. आता चीनमधून येणाऱ्या या विषाणू संसर्गाच्या बातम्यांवरून चिंतेचे कारण नाही. या विषाणूबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. नाहक भीती निर्माण करण्याची गरज नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसन संसर्ग रुग्णांच्या आकडेवारीचा आढावा घेतला आहे. श्वसन संसर्गाच्या रुग्णांमध्ये २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पालिका सज्ज

मुंबई शहर आणि उपनगरात एचएमपीव्ही  बाधित रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. तथापि, नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

हे करा-

 खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्या.  हात साबण लावून स्वच्छ करा किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरचा वापर करा.  ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर रहा.  भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्नपदार्थ खा.  संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेंटिलेशन) होईल, याची दक्षता घ्या. 

हे करू नका-

 हस्तांदोलन  टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर   रुग्णांशी जवळून संपर्क  डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श  सार्वजनिक ठिकाणी थुंकणे  डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन  

मार्गदर्शक सूचना लवकरच

नागरिकांनी घाबरून जाऊ नये. राज्य आरोग्य विभागाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

चीनमधून आलेल्या या नव्या विषाणूंबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. तथापि, सर्वेक्षणाला गती देऊन सर्दी- खोकला (आयएलआय) आणि सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.- डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, आरोग्य सेवा

टॅग्स :HMPV Virusह्युमन मेटापन्यूमोव्हायरसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य