शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
2
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
3
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
4
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
5
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
6
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
7
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
8
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
9
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
10
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
11
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
12
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
13
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
14
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
15
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
16
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
17
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
18
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
19
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
20
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
Daily Top 2Weekly Top 5

‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:52 IST

Anandacha Shidha Yojana News: महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यापासून आनंदाचा शिधा योजनेसाठी निधीच देण्यात आलेला नसल्याचे म्हटले जात आहे.

Anandacha Shidha Yojana News: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून सणाच्या दिवशी १ कोटी ६३ लाख लोकांना लाभ मिळत होता. या आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना  एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होते. परंतु, राज्याच्या आर्थिक चणचणीमुळे या योजनेसाठी निधीच नसल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे अतिवृष्टी आणि पूरस्थितीने राज्यात प्रचंड मोठे नुकसान झाले असताना शेतकरी तसेच गरिबांची दिवाळी फराळाविनाच जाईल, असे चित्र असल्याचे म्हटले जात आहे. 

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने ६० लाख हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. लाखो शेतकऱ्यांना अद्यापही मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे दिवाळीत तरी दिलासा देण्याबाबत आनंदाचा शिधा योजनेचा लाभ सरकारकडून देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु, दिवाळी दोन आठवड्यांवर आलेली असताना शासकीय पातळीवर याबाबत कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही. तसेच इतक्या कमी कालावधीत आनंदाचा शिधावाटप करणे अवघड असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

आनंदाचा शिधा योजना कायमची बंद होण्याची चिन्हे

राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी महायुती सरकारने तीन वर्षांपूर्वी 'आनंदाचा शिधा' योजना सुरू केली होती. परंतु, राज्याच्या सध्याच्या आर्थिक चणचणीमुळे ही योजना आता कागदावरच राहिल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीलाही नागरिकांना हा आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे म्हटले जात असून, ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची चिन्हे असल्याचे सूत्रांकडून समजते.

यंदा दिवाळीत सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने निवडणुकीनंतर सत्तेवर येण्यासाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, आनंदाचा शिधा गोजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना यासह अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर सत्तेवर येताच आर्थिक चणचणींमुळे अनेक लोकप्रिय योजनांना कात्री लागण्यास सुरुवात झाली. यंदा दिवाळीत सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, एकनाथ शिदे यांच्या सरकारने नेतृत्वाखालील शिव जयंती, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेच आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी या उत्सवांच्या काळात सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा दिला होता. मात्र विधानसभा निवडणूक होऊन महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यापासून आनंदाचा शिधा योजनेसाठी निधीच देण्यात आलेला नसल्याचे समजते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's 'Anandacha Shidha' Scheme Faces Fund Crunch, Diwali Gloom Looms

Web Summary : Maharashtra's 'Anandacha Shidha' scheme, providing food kits to the poor, faces funding shortages. With Diwali approaching and farmers already struggling due to crop losses, the scheme's future looks uncertain, potentially leaving many without festive essentials. The scheme may permanently shut down due to financial constraints.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2024State Governmentराज्य सरकारMahayutiमहायुतीgovernment schemeसरकारी योजना