म्हाडाची धारावीवासीयांना दिवाळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 02:57 IST2016-10-27T02:57:15+5:302016-10-27T02:57:15+5:30

म्हाडातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर-५ चा पुनर्विकास केला जात आहे. या प्रकल्पांतर्गत धारावीत उभारण्यात आलेल्या १८ मजली पथदर्शी इमारतीत क्लस्टर

Diwali gift to Dharavi residents of MHADA | म्हाडाची धारावीवासीयांना दिवाळी भेट

म्हाडाची धारावीवासीयांना दिवाळी भेट

मुंबई : म्हाडातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर-५ चा पुनर्विकास केला जात आहे. या प्रकल्पांतर्गत धारावीत उभारण्यात आलेल्या १८ मजली पथदर्शी इमारतीत क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना दिवाळीच्या मुहूर्तावर २८ आॅक्टोबर रोजी सदनिकांचा ताबा दिला जाणार आहे.
दरम्यान, १८ आॅक्टोबर रोजी क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना चिट्ठी पद्धतीने सोडत काढून सदनिकांचे वितरणपत्र देण्याबरोबरच, पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका द्यावी, याबाबतचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Diwali gift to Dharavi residents of MHADA