शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

दिव्यांग होणार स्वयंरोजगाराच्या रथावर स्वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 06:00 IST

दिव्यांगांना स्वयंरोजगाराचे कायमस्वरुपी साधन मिळावे यासाठी राज्य सरकारने दिव्यांग स्वावलंबी योजना आणली आहे.

ठळक मुद्दे प्रत्येक लाभाथ्यार्ला सुमारे पावणेचार लाख रुपये किंमतीचे वाहन या योजनेअंतर्गत दिले जाणारवाहन नोंदणी ते व्यवसाय प्रक्षिणही मिळणार मोफत

विशाल शिर्केपुणे : दिव्यांगांना स्वयंरोजगाराचे कायमस्वरुपी साधन मिळावे यासाठी राज्य सरकारने दिव्यांग स्वावलंबी योजना आणली आहे. त्या अंतर्गत दिव्यांगांना हरित ऊर्जेवर चालणारी फिरती मोबाईल व्हॅन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आल्याची माहिती अपंग कल्याण आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. प्रत्येक लाभाथ्यार्ला सुमारे पावणेचार लाख रुपये किंमतीचे वाहन या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात शहरात विविध ठिकाणी दिव्यांग व्यक्ती आपल्या विशेष वाहनांद्वारे खवय्यांची क्षुधा शांती करताना दिसतील. दिव्यांग व्यक्तींना स्वालंबी बनविण्यासाठी २०१८-१९च्या अर्थसंक्लपीय भाषणात हरित उर्जेवर चालणाºया फिरती वाहने देण्याची घोषणा केली होती. दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारास चालना देणे, दिव्यांगांचे आर्थिक पुनर्वसन करण्याचा उद्देश या मागे आहे. त्या पार्श्वभूमीवर अपंग कल्याण आयुक्तालयाने नोव्हेंबर २०१८मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाकडे या योजनेसाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी पुरवणी मागणी सादर केली होती. मंत्रीसमितीने २२ जानेवारी रोजी या योजनेस हिरवा कंदिल दाखविला आहे. त्यामुळे या योजनेस निधी उपल्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच हा निधी प्रशासनास उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या योजनेअंतर्गत दिव्यांगांना फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करुन दिले जाईल. त्यावर सँडविच, बर्गर, घरगुती नाश्ता अथवा इतर खाद्यपदार्थांची विक्री करता येईल. तसेच, किरकोळ किराणा मालाचे दुकान देखील चालविणे शक्य होईल. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या मार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थ्यांची निवड केली जाईल. अत्याधुनिक संगणकीय प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या व्यवसायास मदत करण्यासाठी जीपीआरएस, सॉफ्टवेअर मॉनिटरींग अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. लाभाथ्यार्ला व्यवसायाच्या भांडवलासाठी अपंग वित्त महामंडळ, बँक अथवा स्वत: पैसे उभारावे लागतील. मोबाईल व्हॅन वाटपासाठी परिवहन विभागाच्या परवानगीने देण्यात येणारे वाहन, ई-कार्ट आणि स्पेसिफिकेशन नुसार देण्यात येतील. मोबाईल व्हॅन पुरविल्यानंतर एक वर्षे कालावधीसाठी निवड केलेल्या पुरवठादारांमार्फत वाहनाची देखभाल व दुरुस्ती करण्यात येईल, असे राज्य सरकारच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. --------------------वाहन नोंदणी ते व्यवसाय प्रक्षिणही मिळणार मोफतदिव्यांग स्वावलंबी योजनेसाठी निवडलेल्या व्यक्तीस यो योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेली संस्था व्यवसायानुरुप प्रशिक्षण देईल. तसेच, वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) नोंदणी, दिव्यांग लाभार्थ्यास वाहन परवाना देणे अशी कामे देखील संबंधित संस्थाच करेल. तसेच, एखादा दिव्यांग व्यक्ती वाहन परवाना मिळण्यास पात्र नसल्यास, त्याच्या वतीने इतर सक्षम व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवाना देण्यात येणार आहे. वाहन विमा उतरविणे, महानगरपालिका अथवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून फिरता व्यवसाय करण्याचा परवानाही संबंधित संस्थाच मिळवून देईल.      

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार