शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या विद्युत योजनांसाठी जिल्हानिहाय समित्या

By admin | Updated: June 3, 2015 23:58 IST

राज्याचा निर्णय : विजेच्या पायाभूत सुविधांना मिळणार गती

राम मगदूम -गडहिंग्लज -केंद्र शासन पुरस्कृत विद्युत योजनांची अंमलबजावणी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात जिल्हानिहाय ‘जिल्हा विद्युत समित्या’ गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील वीज विषयक पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार आहे.केंद्राने वीज विषयक पायाभूत सुविधांकरिता राज्यातील ग्रामीण भागासाठी ‘दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना’(डीडीयूजीजेवाय) व शहरी भागासाठी ‘एकात्मिक ऊर्जा विकास योजना’ (आयपीडीएस-इंटीग्रेडेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम) सुरू केली आहे. सर्वांना अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा करणे हेच या दोन्ही योजनांचे उद्दिष्ट आहे. संबंधित वीज वितरण परवानाधारकांस या योजनांचा सर्वंकष अहवाल (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) बनविताना संबंधित लोकप्रतिनिधींशी विचारविनिमय करून तसे प्रमाणपत्र प्रकल्प अहवालासोबत द्यावे लागणार आहे.या सुविधा निर्माण होणारदीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेंतर्गत ग्रामीण भागातील फिडर सेपरेशन, वीज वितरण जाळ्यांचे बळकटीकरण, ग्रामीण भागातील उपकेंद्र, रोहित्र, फिडर व ग्राहकांचे मीटर अद्ययावत करणे, गावांचे विद्युतीकरण करणे, आदी कामे अंतर्भूत आहेत.एकात्मिक ऊर्जा विकास योजनेत शहरी भागातील वीज वितरण जाळ्यांचे बळकटीकरण, शहरी भागातील उपकेंद्र, फिडर, रोहित्र व ग्राहकांचे मीटर अद्ययावत करणे, तसेच शहरी वीज वितरण प्रणालीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा समावेश करून वितरणप्रणाली समावेशक करणे, इत्यादी कामे अंतर्भूत आहेत. समितीची कर्तव्ये / जबाबदाऱ्याविद्युतविषयक सर्व योजनांचा आढावा घेणे व अंमलबजावणी दरम्यान संनियंत्रण ठेवणेदर तीन महिन्यांतून किमान एकदा जिल्हा मुख्यालयात समितीच्या बैठका घेणेडीडीयूजीजेवाय व आयपीडीएस या योजनांचे प्रकल्प अहवाल बनविताना विचारविनिमय करणे.वीजपुरवठ्याची गुणवत्ता व ग्राहक समाधान या बाबींचा आढावा घेणे.वीज बचत व विजेचे संवर्धन करण्याकरिता प्रोत्साहन देणे.अशी असेल जिल्हा समितीजिल्ह्यातील ज्येष्ठ खासदार (अध्यक्ष), जिल्ह्यातील इतर सर्व खासदार (सह. अध्यक्ष), जिल्ह्यातील सर्व विधान परिषद / विधानसभा सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, ऊर्जा, कोळसा, अपारंपरिक ऊर्जा या केंद्र पुरस्कृत उपक्रमांमधील ज्येष्ठ अधिकारी (सर्व सदस्य), जिल्हाधिकारी (आयोजक), संबंधित वीज वितरण कंपनीचे मुख्य / अधीक्षक अभियंता (सदस्य सचिव)