जि. प. निवडणुकांचा संशोधन अहवाल
By Admin | Updated: August 8, 2016 05:21 IST2016-08-08T05:21:24+5:302016-08-08T05:21:24+5:30
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भातील संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

जि. प. निवडणुकांचा संशोधन अहवाल
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भातील संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने ‘यशदा’च्या मदतीने पुण्यातील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा या अहवालात घेतला आहे.
आयोगाच्या संकेतस्थळावर तो अभ्यासकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अल्प प्रमाणात संशोधन झाले आहे. त्यामुळे आयोगाने याबाबत संशोधन करण्यासाठी आवाहन केले होते.