शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

‘विसरभोळ्या’ मोटरमनचा मनस्ताप

By admin | Updated: August 1, 2014 04:23 IST

सध्या ‘विसरभोळ्या’ मोटरमनचा प्रवाशांना मोठा मनस्ताप होऊ लागला आहे. अशीच घटना गुरुवारी दुपारी घडली.

मुंबई : सध्या ‘विसरभोळ्या’ मोटरमनचा प्रवाशांना मोठा मनस्ताप होऊ लागला आहे. अशीच घटना गुरुवारी दुपारी घडली. सीएसटीला येणारी जलद लोकल भायखळा स्थानकात न थांबताच थेट सीएसटीला आल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला, भायखळा येथे उतरणाऱ्या प्रवाशांना पुन्हा परतीचा प्रवास करावा लागणार असल्याने संतापलेल्या प्रवाशांनी मोटरमनलाच घेराव घातला.दुपारी १२.५५ वाजता पंधरा डब्यांची कल्याण-सीएसटी या जलद ट्रेनवर मोटरमन आर.पी. सिंग आणि गार्ड आर.एन. सिंग कार्यरत होते. दादर स्थानकातून ही ट्रेन सुटल्यावर भायखळा स्थानकात थांबणे अपेक्षित होते. मात्र ही ट्रेन भायखळा येथे न थांबता थेट सीएसटी स्थानकात जाऊन थांबली. त्यामुळे भायखळा स्थानकात उतरण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. ट्रेन थांबली का नाही, काय झाले याची प्रवासी एकमेकांना विचारणा करू लागले. दादर स्थानक सोडल्यानंतर ‘पुढील स्थानक भायखळा’ अशी उद्घोषणा लोकल डब्यात होत असतानाही भायखळा स्थानकात ती न थांबल्याने प्रवाशांचा पारा अधिकच चढला. सीएसटी स्थानकात लोकल आल्यानंतर महिला आणि पुरुष प्रवाशांनी मोटरमनला घेराव घालून त्याचे कारण विचारले. मात्र प्रवाशांचा राग पाहून मोटरमनकडून काहीएक उत्तर देण्यात आले नाही. अखेर माफी मागितल्यानंतर आणि रेल्वे सुरक्षा दल आल्यानंतर मोटरमनची सुटका झाली. (प्रतिनिधी)