शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डिस्कव्हरी मराठीसाठी नेटीझन्समध्ये उदासीनता

By admin | Updated: May 12, 2015 02:20 IST

नॅशनल जिओग्राफिक, अ‍ॅनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरीसारख्या चॅनेल्सवरील माहितीपूर्ण कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानीच.

मुंबई : नॅशनल जिओग्राफिक, अ‍ॅनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरीसारख्या चॅनेल्सवरील माहितीपूर्ण कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानीच. परंतु भाषा हा अडसर असल्याने अनेकांना याचा पूर्णपणे आस्वाद घेता येत नाही. महाराष्ट्रातही प्रादेशिक भाषांतल्या कार्यक्रमांच्या प्रेक्षकसंख्येत मराठी कार्यक्रमांची प्रेक्षकसंख्या निर्विवादपणे अग्रस्थानी आहे. त्यामुळे डिस्कव्हरीच्या मराठी व्हर्जनसाठी वाहिनीकडे आॅनलाईन निवेदन पाठविण्याचे कार्य काही वर्षांपासून सुरु आहे. मात्र मराठीचे गोडवे गाणाऱ्या मराठीजनांनी मात्र याकडे सपशेल पाठ फिरवली आहे.भारतासारख्या बहुभाषिक देशात प्रादेशिक भाषांचे महत्त्व मोठे आहे. दाक्षिणात्य राज्य हे त्याचे उत्तम उदाहरण. म्हणूनच चॅनेल्सनी याचे महत्त्व ओळखून दाक्षिणात्य भाषांमध्ये डब केलेले कार्यक्रम दाखविण्यास सुरुवात केली. परंतु, डिस्कव्हरी वाहिनी मराठी भाषेत सुरु करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेला केवळ ३२ व्यक्तींनी प्रतिसाद दिला. मराठीबाबत अजूनही उदासिनता असल्याचेच यातून दिसून आले. एका बाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रांती होत असताना दुसऱ्या बाजूला ‘वी वॉन्ट डिस्कव्हरी नेटवर्क इन मराठी’ हे फेसबुकवरील पेज दुर्लक्षित असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २००३ सालापासून सुरु झालेली ही मोहीम थंड पडलेली आहे.‘डिस्कव्हरी’ नेटवर्क मराठी भाषेत सुरु करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक ताकदीने याविषयी जनजागृती झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचा या मोहिमेतील सहभाग वाढविला पाहिजे. जेणेकरुन, वाहिनीने लवकरात लवकर मराठी भाषेतील कार्यक्रमांसाठी हालचाल सुरु केली पाहिजे, असे साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)