विवेक पंडित, पंकजा मुंडे यांच्यात चर्चा

By Admin | Updated: September 22, 2016 03:14 IST2016-09-22T03:14:13+5:302016-09-22T03:14:13+5:30

विवेक पंडित आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात १५ ते २० मिनिटे शासकीय विश्रामधामावर सकारात्मक चर्चा झाली

Discussion between Vivek Pandit, Pankaja Munde | विवेक पंडित, पंकजा मुंडे यांच्यात चर्चा

विवेक पंडित, पंकजा मुंडे यांच्यात चर्चा


पालघर: श्रमजिवी संघटनेचे नेते विवेक पंडित आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात १५ ते २० मिनिटे शासकीय विश्रामधामावर सकारात्मक चर्चा झाली पंडित यांना चर्चेसाठी वेळ द्यायची व त्या बदल्यात त्यांच्या संघटनेने हा दौरा निर्विघ्न पार पडू द्यायचा असा छुपा तह या दोघात झाला होता.
प्रत्यक्ष कुपोषण निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना होत नाही तो पर्यंत मंत्र्यांचे दौरे होऊ देणार नाही अशी भूमिका श्रमजीवी संघटनेने घेतली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी विवेक पंडित यांच्याशी स्वत: संपर्क करून चर्चेचे आमंत्रण दिले. विवेक पंडितांनी हिरवा कंदील दिल्याने संघटनेच्या तीन हजार लोकांसमोर पंकजा मुंडे थेट चर्चेला आल्या. या चर्चेत श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित आणि शिष्टमंडळाने २५ प्रमुख मागण्या मुंडे यांच्यासमोर मांडल्या. मुंडे यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेऊन पाऊले उचलली जातील असे आश्वासन दिले.
श्रमजीवी च्या शिष्टमंडळात विवेक पंडित यांच्यासोबत बाळाराम भोईर, विजय जाधव, दत्तू कोळेकर अशोक सापटे, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, जया पारधी,संतोष धिंडा, पांडू मालक, इत्यादी कार्यकर्ते होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, खासदार चिंतामण वणगा, आमदार पास्कल धनारे, आमदार मनीषा चौधरी,जि.प. अध्यक्ष सुरेखा थेतले, इत्यादी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Discussion between Vivek Pandit, Pankaja Munde