शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

मराठा आरक्षण, शेतकरी विधेयकावर उद्धव ठाकरे-शरद पवारयांच्यात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 06:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शनिवारी रात्री वर्षा निवासस्थानी पाऊण ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शनिवारी रात्री वर्षा निवासस्थानी पाऊण तास चर्चा झाली. मराठा आरक्षण, संसदेतील शेतकरी विधेयक, ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आदी मुद्द्यांवर या वेळी चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कुठली भूमिका घ्यायची, यावर बैठकीत विचार झाला. नव्याने अध्यादेश काढून मराठा आरक्षण द्यावे, असे मत पवार यांनी अलीकडे व्यक्त केले होते. मात्र, ते कायद्याच्या चौकटीत शक्य होणार नाही, असे समोर आले. आता सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात मोठे घटनापीठ तातडीने स्थापन करावे आणि आधी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी, अशी विनंती राज्य सरकार करेल. याबाबतही दोघांत चर्चा झाली.

नरेंद्र मोदी सरकारच्या तीन शेतकरी विधेयकासंदर्भात राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कुठली भूमिका घ्यावी, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. हे तिन्ही कायदे घाईघाईने मंजूर करून घेण्याऐवजी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावेत आणि विविध पक्षांना असलेल्या शंकांचे निरसन करावे, अशी भूमिका राष्ट्रवादी, शिवसेनेतर्फे घेतली जाण्याची शक्यता आहे.

शहरांसह राज्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. सरकारच्या उपाययोजनांची माहिती ठाकरे यांनी पवार यांना दिली. यासंदर्भात पवार यांनी काही सूचना केल्या. इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनावरून झालेल्या मानापमानासंदर्भातही चर्चा झाली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षण