शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली; संजय राऊतांची माहिती, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 12:23 IST

आम्हाला एकमेकांशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थांची, कोणत्याही नाटकाची गरज नाही असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या विविध शहरांमध्ये ठाकरे बंधुंनी एकत्रित यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावेत असे बॅनर्स झळकले आहेत. त्यानंतर गुरुवारी मनसे नेते अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांची भेट झाली. या भेटीनंतर राऊत मातोश्रीवर गेले तर पानसे शिवतीर्थावर पोहचले. त्यामुळे मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांना उधाण आले.

आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासोबत बोलायला मध्यस्थींची गरज नाही. माझी आणि राज ठाकरे यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत.  भले आमचे रस्ते वेगळे झाले असले तरी आमची इमोशनल अटॅचमेंट आजही आहे. या संदर्भात माझं बोलणं झालं आहे. चर्चा घडवण्यासाठी या नोटंकी केल्या जातात. आम्ही कोणालाही आमंत्रण दिलं नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही भाऊ आहेत सगळ्यांना माहित आहे. राज ठाकरे संजय राऊत यांची मैत्री ही सगळ्यांना माहित आहे. ज्या काही चर्चा सुरू आहेत त्याबद्दल सविस्तर उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. त्यात उद्धव ठाकरे काय म्हणाले हे मी सांगू शकत नाही. हा आमच्या पक्षांतर्गत विषय आहे असं राऊतांनी म्हटलं.

त्याचसोबत राज ठाकरे आणि आमचे रस्ते वेगळे झाले आहेत. मी आमच्या पक्षाची भूमिका मांडत आहे त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने काम करतो. आम्हाला एकमेकांशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थांची, कोणत्याही नाटकाची गरज नाही. उद्धव आणि राज ठाकरे हे भाऊ आहे. एक कुटुंब आहे. एक फोन उचलायचा आणि एकमेकांशी बोलायचं कोणी येऊन नोटंकी करण्याची गरज नाही. या ज्या चर्चा झाल्या या संदर्भात आम्ही सविस्तर बोललो असं संजय राऊतांनी सांगितले.

शिंदेंचे १७-१८ आमदार संपर्कात

शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहेत. शिंदे गटातील ४ जणांनी आज ही माझ्यासोबत संपर्क केला. हे आमदार त्यांच्या व्यथा आमच्याकडे मांडत आहेत. आम्ही ऐकण्याचे काम करतो. ते आमचे जुने सहकारी आहेत. आम्ही त्यांच्यासोबत काम केलंय. मागील ८ दिवसांपासून संपर्क सुरू आहे. त्यांना पक्षात घ्यायचे की नाही तो निर्णय पक्षप्रमुखांचा आहे पण ते संपर्कात आहेत असं संजय राऊतांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे