सत्तेसाठी विस्कळीत धडपड
By Admin | Updated: November 13, 2014 01:34 IST2014-11-13T01:34:46+5:302014-11-13T01:34:46+5:30
भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी शिवसेना शेवटच्या क्षणार्पयत धडपड करीत राहिली़ मात्र भाजपाने सगळ्या गोष्टी ठरवल्यानुसार पार पाडल्या आणि सेनेला विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावे लागले.

सत्तेसाठी विस्कळीत धडपड
मुंबई : भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी शिवसेना शेवटच्या क्षणार्पयत धडपड करीत राहिली़ मात्र भाजपाने सगळ्या गोष्टी ठरवल्यानुसार पार पाडल्या आणि सेनेला विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावे लागले. सत्तेजवळ जाण्याची धडपड शेवटच्या क्षणी एवढी वाढली की नव्या अध्यक्षांच्या अभिनंदनाची भाषणो सुरू असतानाही सेनेच्या आणि भाजपाच्या बाकावरून चिठ्ठय़ांचे आदानप्रदान सुरू होते.
सकाळी रामदास कदम यांनी शिवसेना विरोधात बसणार, असे जाहीर केले. त्यानंतर काही वेळातच मिलिंद नाव्रेकर विधान भवनात आले. हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले. तेथे पुन्हा चर्चा सुरू झाली. दरम्यान, सभागृहाची वेळ झाली. भाजपा नेते सभागृहात आले तेव्हादेखील खाणाखुणा, चिठ्ठी पाठवणो, सभागृहाबाहेर जाणो असे प्रकार सुरू होते.
खासदार अनिल देसाई यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार, हे कळताच सेनेच्या खासदारांचा एक गट प्रचंड अस्वस्थ झाला. राज्यमंत्री आपण घ्यायचे नाही, असे कारण पुढे करीत या गटाने टोकाची भूमिका घेतल्यानेच देसाई यांना दिल्ली विमानतळावरूनच मुंबईला परतावे लागले. दुसरीकडे राज्यात 15 वर्षानंतर सत्ता मिळत असताना ती का नाकारायची, असे सांगत आमदार आक्रमक झाले. नीलम गो:हे, दिवाकर रावते, रामदास कदम, सचिन सावंत या विधान परिषद सदस्यांना मंत्री व्हावे, असे तीव्रतेने वाटत होते. तर सेनेत तिसरा गट निष्ठावंत होता, ज्यांना सुरू असलेले सगळे नाटय़ लाचारीचे वाटत होते. त्यांना शिवसेनेचा स्वाभिमान गहाण टाकून सत्ता नको होती.
सभागृहाबाहेर या सर्व रस्सीखेचात खा. संजय राऊत, मिलिंद नाव्रेकर, सुभाष देसाई यांच्या भूमिका पक्षाला मदत करणा:या आहेत की विरोधात, हे स्पष्ट होत नव्हते. सकाळी विरोधी पक्ष नेतेपदाची निवड होत असतानादेखील शिवसेनेचेच काही सदस्य कशाला एकनाथ शिंदे शपथ घेत आहेत, असे बोलत होते. लाल दिव्याची गाडी आपल्याला न मिळता एकटय़ा शिंदेंना मिळते आहे, हे देखील त्या नाराजीचे एक कारण होते. विरोधी पक्षनेते पद मिळाल्यानंतरही सेनेच्या चेह:यावर आनंदाऐवजी हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गेल्याचेच दु:ख अधिक होते. ही अस्वस्था इतकी टोकाची होती की राज्यपालांच्या अभिभाषणावेळी देखील काँग्रेस घोषणाबाजी करीत होती, राष्ट्रवादी शांत बसून होती आणि विरोधी पक्षाचे माप पदरात पाडून घेणा:या शिवसेनेने करायचे तरी काय, हा प्रश्न प्रत्येकाच्या चेह:यावर होता. (प्रतिनिधी)
च्सकाळी विश्वासदर्शक ठरावावेळी देखील ज्या पद्धतीचे फ्लोअर मॅनेजमेंट करायला पाहिजे होते, ते देखील सेनेने केले नव्हते. पोल मागायचा तो नेमका कोणत्या वेळी, यावरूनही गोंधळ उडाला होता.
च्मतदान मागायचे होते तर विधानसभेत वेलमध्ये न उतरता सगळ्यांनी मोठय़ा आवाजात तेवढीच मागणी लावून धरली असती, तरी अध्यक्षांना पुढे जाता आले नसते. मात्र अशा संकटकाळी नेमके काय करायचे याचे नियोजनच सेनेच्या आमदारांजवळ नव्हते.
च्सभागृहाबाहेर या सर्व रस्सीखेचीत खा. संजय राऊत, मिलिंद नाव्रेकर, सुभाष देसाई यांच्या भूमिका पक्षाला मदत करणा:या आहेत की विरोधात, हे स्पष्ट होत नव्हते. नाव्रेकर यांचा तेथे असणारा वावर सगळ्यांच्या भुवया उंचावणारा होता. सकाळी विरोधी पक्षनेते पदाची निवड होत असतानादेखील शिवसेनेचेच काही सदस्य कशाला एकनाथ शिंदे शपथ घेत आहेत, असे बोलत होते.