माहिती संचालनालयाची गंभीर चूक, स्वातंत्र्य दिनाऐवजी प्रजासत्ताक दिनाचा संदर्भ देत जाहीर केली पदके
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 00:06 IST2017-08-14T23:56:30+5:302017-08-15T00:06:25+5:30
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्या गृह खात्याने विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांना शौर्य पदके जाहीर केली. मात्र ही पदके जाहीर करतानामाहिती संचालनालयाकडून गंभीर चूक झाली आहे.

माहिती संचालनालयाची गंभीर चूक, स्वातंत्र्य दिनाऐवजी प्रजासत्ताक दिनाचा संदर्भ देत जाहीर केली पदके
- कुंदन पाटील
मुंबई, दि. १४ - स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्या गृह खात्याने विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांना शौर्य पदके जाहीर केली. मात्र ही पदके जाहीर करताना राज्य सरकारच्या कडून गंभीर चूक झाली आहे. माहिती संचालनालयाने १५ ऑगस्टला स्वातंत्र दिनाऐवजी प्रजासत्ताक दिन संबोधले आहे. त्यामुळे सरकारी खात्याचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
माहिती संचालनालयाकडून सोमवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या परिपत्रकामध्ये ही चूक झाली आहे. त्यामध्ये परिपत्राच्या सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाऐवजी प्रजासत्ताक दिन असा उल्लेख करण्यात आला आहे. पण पत्राच्या आत मात्र स्वातंत्र दिन असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे नजरचुकीने हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. तरीही झाल्या प्रकारामुळे सरकारची नाचक्की झाली आहे.