शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षांवर आणणार- दिलीप कांबळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 4:02 PM

राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांकरिता आर्थिक फसवणूक व निर्घृण हत्या होत असल्याचे दिसून येणे तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या वयोमर्यादेबाबत आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. लीप कांबळेंनी उत्तर दिलं आहे.

मुंबई- राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांकरिता आर्थिक फसवणूक व निर्घृण हत्या होत असल्याचे दिसून येणे तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या वयोमर्यादेबाबत आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. दिलीप कांबळेंनी उत्तर दिलं आहे.या लक्षवेधीवर बोलताना आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रश्न विचारला की, महत्त्वाचा धोरणात्मक प्रश्न म्हणजे ज्येष्ठांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर कधी आणणार?, गो-हेंच्या या प्रश्नावर दिलीप कांबळेंनी उत्तर दिलं आहे. पुढील अधिवेशनाच्या आत वयोमर्यादा ६५ वरून ६० वर आणण्याचा निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. मातोश्री वृद्धाश्रम योजना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद लाभलेली योजना होती. हे अनुदान लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, आ.डॉ.गोऱ्हे यांनी सुचविल्याप्रमाणे कोल्हापुरात क्रॉनिक दीर्घकालीन आजारी ज्येष्ठ नागरिकांसाठी 'सावली' संस्था उभारण्यात आली आहे. त्या धर्तीवर सामाजिक संस्थांना विश्वासात घेऊन विस्मरण, अल्झमायर यांसारख्या रुग्णांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक 'मॉडेल' संस्था उभारण्यात येईल. या प्रश्नावर बैठक घेतली जाईलच. परंतु ज्येष्ठ नागरिकांच्या निधनानंतर नातेवाईकांना दूरच्या  देशातून पोहोचण्यास जो वेळ लागतो तोपर्यंत ज्या व्यवस्था लागतात त्यासाठीही योग्य त्या सुविधा करण्यास योग्य त्या सूचना देण्यात येतील, याबाबत डॉ. गोऱ्हे यांच्या अपेक्षेनुसार लवकरच बैठकही घेण्यात येईल.

डॉ. आ. नीलम गोऱ्हे यांचं सभागृहात केलं अभिनंदनया सभागृहाला अभिमान वाटेल अशी गोष्टी घडलेली आहे. आपल्या सभागृहाच्या सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक महिला आयोगाच्या ६२ व्या सत्रात आर्थिक सामाजिक परिषदेच्या संस्था सदस्य प्रतिनिधी या नात्याने सहभागी झाल्या होत्या. त्यांनी स्त्री आधार केंद्राच्या समांतर परिसंवादात "नैसर्गिक आपत्तीच्या पूर्वतयारीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग" यावर त्यांनी अध्यक्ष म्हणून विचार मांडले. हे आपल्या महाराष्ट्र राज्याला व सभागृहाला भूषणावह आहे. आपण सभागृहाने त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. मी सन्माननीय सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.