शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पतंगरावांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात हळहळ, मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 00:28 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, यांच्यासह विविध मान्यवरांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

मुंबई -  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राला धक्का बसला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण,  यांच्यासह विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाची झालेली हानी भरून निघणारी नाही. पतंगराव कदम हे जवळपास पन्नास वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये एक शिक्षक या नात्याने केली होती. शिक्षणसंस्था निर्माण करणे हे त्यांचे स्वप्न होते आणि भारतीय विद्यापीठ या नावाने त्यांनी एक अभूतपूर्व शिक्षणसंस्था निर्माण केली. त्यात जवळपास चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि व्यक्तिगत स्वरूपात मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे मला तीव्र दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनामुळे पक्षाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. या दु:खद प्रसंगी माझ्या संवेदन त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष पतंगराव कदम यांच्या जाणामुळे आम्ही एका अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत. ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक होते. त्यांनी राज्य सरकारमधील मंत्री म्हणून आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र  

ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.  काँग्रेस पक्ष कदम कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे,   -  अशोक चव्हाण, काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्रीकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ.डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे राज्यातील एक दूरदर्शी व दिलदार नेतृत्व हरपल्याची भावना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. आ.डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, नागपूर अधिवेशनात आम्ही एकत्र होते. त्यानंतर ते असे अचानक आजारी पडतील आणि जगाचा निरोप घेतील, अशी शंकाही कधी जाणवली नाही. आजारपणातून ते बरे होऊन परततील, अशी आशा आम्ही बाळगून होतो. मात्र नियतीने त्यांच्यावर घाला घालून राज्यातील एक उमद्या मनाचे नेतृत्व हिरावून घेतले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे पतंगराव यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले, "माझे जवळचे मित्र व सहकारी डॉ.पतंगराव  कदम यांचे दुःखद निधन झाल्याचे कळले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी आपल्या कार्याचा आदर्श समाजासमोर निर्माण केला. भावपूर्ण श्रद्धांजली."

 

पतंगरावांसह आमचे व्यक्तिगत संबंध होते महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यरत होते, महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजकारण आणि राजकारण केले ,  पतंगराव कदम यांच्या  अकस्मात मृत्यूने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री, महाराष्ट्र

पतंगराव कदम यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एक  ज्येष्ठ , उमदे,  दिलखुलास व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. राज्याच्या राजकारणाला ,  समाजकारणाला, सहकार व शैक्षणीक क्षेत्राला वेगळी ओळख करून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.  कधी काळी 2 खोल्यात सुरु झालेले भारती विद्यापीठ आणि आजचा त्याचा झालेला वटवृक्ष त्यांच्या कार्याची ओळख करून देते. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली - धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते विधान परिषद 

कसबा पेठेत छोटयाशा पत्र्याच्या खोलीत भारती विद्यापीठाचे कार्यालय सुरू केल्यापासून पंतगरावांचा आणि माझा परिचय होता. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. अथक प्रयत्न, चिकाटी, शिक्षणाबदद्ल कमालीची ओढ, यातून त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना करीत त्यांनी शिक्षण तळागाळापर्यंत पोहचवले. मिनमिळावू, सर्वांशी संपर्क असणारे, हसतमुख असा हा नेता होता. त्यांना मी कधीही चिडलेले पाहिलेले नाही. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणाºया एका थोर नेत्याला आपण मुकलो आहोत. त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली.

- गिरीश बापट 

अत्यंत दुर्दैैवी अशी घटना आज घडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा शैैक्षणिक, सहकार क्षेत्रात खोल अभ्यास होता. शून्यातून विश्व कसे निर्माण करायचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पतंगराव. एक मनमोकळा, दिलदार नेता आणि आमचे ज्येष्ठ सहकारी गमावल्याने काँग्रेसचे फार मोठे नुकसान झाले आहे.

- हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री 

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमMaharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेस