शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजीटल पध्दतीने जतन करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 17:59 IST

बनावट पदव्या तयार होऊ नयेत, दुसऱ्याच्या नावावर तोतया बनून कुणाला परीक्षा देता येऊ नये यासाठी पदवी प्रमाणपत्रावर त्या विद्यार्थ्यांर्चा फोटो छापणे बंधनकारक करण्याचा निर्णय आम्ही घेतला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळून पाहणे सहज शक्य होणारयंदाच्या अर्थसंकल्पात त्यामध्ये वाढ करून सव्वा लाख कोटीपर्यंत वाढवली

पुणे : देशातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक प्रमाणपत्रे डिजीटल पध्दतीने जतन केली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळून पाहणे सहज शक्य होणार आहे. नॅशनल अ‍ॅकॅडमिक डिपॉझटरी मार्फत या प्रमाणपत्रांचा डाटा जतन केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकश जावडेकर यांनी शनिवारी दिली. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २० व्या पदवी प्रदान समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. विश्वास धापतेसह आदी उपस्थित होते. यावेळी संत शिरोमणी जैन आचार्य विद्यासागरजी महामुनीराज यांना विद्यापीठाची डी. लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. आचार्य महामुनीराज यांच्या प्रतिनिधींनी या पदवीचा स्वीकार केला.प्रकाश जावडेकर म्हणाले, बनावट पदव्या तयार होऊ नयेत, दुसऱ्याच्या नावावर तोतया बनून कुणाला परीक्षा देता येऊ नये यासाठी पदवी प्रमाणपत्रावर त्या विद्याथ्यार्चा फोटो छापणे बंधनकारक करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याचबरोबर आता सर्व विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांचा डाटा नॅशनल अ‍ॅकॅडमिक डिपॉझटरी मार्फत एकत्र करून जतन केला जाणार आहे. यामुळेही पदवीची सत्यता पडताळून पाहणे सोपे होणार आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत त्याचे एकत्रीकरण केले जाईल.जगाच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर गुणवत्ता हाच एकमेव निकष आहे. इथून पुढच्या काळात गुवत्तेच्या आधारेच विद्यापीठांना स्वायत्तता मिळेल. आज डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून १ लाख ८० हजार ग्रंथ शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे जावेडकर यांनी सांगितले.शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात यंदा वाढ केली आहे. २०१४ मध्ये शिक्षणावर ४७ हजार कोटी रुपयांची तरतूद शिक्षणासाठी होती. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यामध्ये वाढ करून सव्वा लाख कोटीपर्यंत वाढवली असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी विद्यार्थ्यांना ध्येय आणि मूल्यांप्रती अढळ राहण्याचा संदेश दिला. कुलगुरू प्रा.डॉ. माणिकराव साळुंखे विद्यापीठाचा अहवाल सादर केला. प्रा. राजेंद्र उत्तूरकर आणि डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

  

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणPrakash Javadekarप्रकाश जावडेकरGovernmentसरकारStudentविद्यार्थी