डिजिटल शाळा अभियान देशभर राबवा

By Admin | Updated: May 3, 2017 03:52 IST2017-05-03T03:52:07+5:302017-05-03T03:52:07+5:30

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. मातृभाषेतून

Digital School Campaigns All over the country | डिजिटल शाळा अभियान देशभर राबवा

डिजिटल शाळा अभियान देशभर राबवा

ठाणे : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. मातृभाषेतून शिक्षण दिल्याने मुलांची तंत्रज्ञान क्षमतादेखील विकसित होते. हे अभियान प्रधानमंत्र्यांच्या डिजिटल इंडियासाठी महत्त्वाचा सहभाग देणारे अभियान आहे. त्यामुळे ज्या वेळेला पंतप्रधानांना भेटेन तेव्हा डिजिटल शाळा हे अभियान संपूर्ण देशात राबविण्याची विनंती करणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भार्इंदर येथे केले.
उत्तन येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्र ीडा विभाग व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल शाळा अभियान राज्यस्तरीय प्रेरणा सभा मंगळवारी आयोजिली होती. त्या वेळी राज्यपाल बोलत होते. या वेळी शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे, खासदार विनय सहस्रबुद्धे, विश्वस्त अरविंद रेगे, शिक्षण सचिव नंदकुमार , कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, हर्षल विभांडीक आदी उपस्थित होते.
विभांडीक यांनी सुरू केलेले हे काम पाहून मी प्रभावित झालो आहे. विभांडीकने महाराष्ट्रात येऊन ब्रेन ड्रेनऐवजी ब्रेन गेन काम सुरू केले आहे. डिजिटल शाळेचा उपक्र म हा चांगला उपक्र म आहे. ग्रामपंचायतीला देण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष निधीतून महाराष्ट्रातील गावे विकसित होत आहेत. मातृभाषेच्या शिक्षणामुळे मुलांची आकलनशक्ती वाढली आहे. आदिवासी भागात डिजिटल शाळा करण्याबरोबरच आरोग्याची काळजी, कुपोषणमुक्ती, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. डिजिटल शाळा हा उपक्र म मी दत्तक घेतलेल्या शाळांतही राबविण्यात यावा, असे प्रतिपादन राज्यपाल यांनी या वेळी केले.
सामान्य माणसाला काम करण्याची इच्छा असते. परंतु सक्षम नेतृत्व हवे असते. डिजिटल शाळांमध्ये सामाजिक सहभाग वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. इंग्रजी शाळेतील ४० टक्के विद्यार्थी आता जिल्हा परिषद शाळेकडे वळत आहेत. डिजिटल शाळेचा प्रयोग म्हणजे ओन युवर स्कूल असा प्रयोग आहे. या शाळेचा दुरुपयोग होणार नाही त्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली पाहिजे. बदलत्या काळात अधिकाधिक शाळा डिजिटल होतील, यासाठी शिक्षण विभाग महत्त्वाची भूमिका बजावेल, असे तावडे यांनी या वेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी खासदार सहस्रबुद्धे यांनी या उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. शिक्षण सचिव नंदकुमार यांनी समयोचित भाषण केले. हर्षल विभांडीक यांनी डिजिटल इंडिया ते न्यू इंडिया हा प्रवास असल्याचे या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)

अधिकाऱ्यांचा सत्कार  
डिजिटल शाळा  उपक्र मात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ओमप्रकाश देशमुख, चंद्रकांत पुलकुंडवार, किशोर राजे निंबाळकर, मोहन देसले, उल्हास नारद, मीना यादव, अशोक पाटील आदी अधिकाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Digital School Campaigns All over the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.