डिजिटल मीडियाचा प्रवास अजूनही स्लो ट्रॅकवरच!

By Admin | Updated: August 17, 2014 02:31 IST2014-08-17T02:31:48+5:302014-08-17T02:31:48+5:30

वर्तमानपत्र-टीव्ही या माध्यमांसोबत ‘डिजिटल मीडिया’ हा शब्द सर्रास कानी पडत आहे.

Digital Media travel still on the Slow track! | डिजिटल मीडियाचा प्रवास अजूनही स्लो ट्रॅकवरच!

डिजिटल मीडियाचा प्रवास अजूनही स्लो ट्रॅकवरच!

>मनोज गडनीस - मुंबई
वर्तमानपत्र-टीव्ही या माध्यमांसोबत ‘डिजिटल मीडिया’ हा शब्द सर्रास कानी पडत आहे. लोकांशी थेट संवाद साधण्याच्या क्षमतेमुळे राजकीय नेत्यांपासून कॉर्पोरेट्सर्पयत सर्वानीच या मीडियाला आत्मसात करायचे जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, ‘मीडिया’ शब्दातील संकल्पना वर्तमानपत्र-टीव्हीतून जितकी ठोसपणो जाणवते, तितक्या जोरकसपणो डिजिटल माध्यमातून जावणत नाही. हे मत नव्हे, तर असा निष्कर्ष पारंपरिक माध्यमांचा होणारा वापर, वापरकत्र्याची संख्या आणि या मापदंडांवर डिजिलट मीडियाला मोजल्यास निघू शकेल.
‘डिजिटल मीडिया’ ज्या इंटरनेटच्या तंत्रवर आधारित आहे, त्याची देशातील स्थिती तपासणो गरजेचे आहे. ब्रॉडबँड, थ्री-जी यामुळे वेगवान इंटरनेट उपलब्ध होत आहे. पण ते होताना वापराचा वेगही वाढायला हवा. ‘इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया’ संस्थेच्या अहवालानुसार, डिसेंबर 2क्14र्पयत इंटरनेट युझर्सची संख्या 24 कोटी 4क् लाखांवर पोहोचेल. लोकसंख्येच्या तुलनेत 19 टक्के! अन्य एका सव्रेक्षणानुसार, ग्रामीण भागातील एकूण 89 कोटी लोकसंख्येपैकी अवघे 4 कोटी 1क् लाख लोक इंटरनेटचा वापर करतात. उरलेला वापर शहरी भागापेक्षाही मेट्रो शहरांतूनच अधिक आहे. त्यातच 76 टक्के लोक हे मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करतात. इंटरनेट वापरायचा पॅटर्न तपासला तर, 7क् टक्के लोक प्रामुख्याने ई-मेल तपासणो, चॅटिंग थोडक्यात मनोरंजनासाठी वापर करतात. बातम्यांसाठी डिजिटल माध्यमाचा वापर अद्यापही एकूण नेटवासीयांच्या तुलनेत 1क् टक्के आहे. यातही नियमितता नाही. त्यामुळे केवळ डिजिलट मीडियाच नव्हे, तर एकूणच इंटरनेट संस्कृती रुजण्यासाठी प्रयत्न होणो गरजेचे आहे.
इंटरनेट युझरची जी संख्या मोजली जाते ती शास्त्रीय आहे, पण सरधोपट वाटते. याचे कारण म्हणजे एक महिन्यात जी व्यक्ती इंटरनेटचा वापर करते, त्याची गणना युझर म्हणून होते. परंतु, नेटचा बोलबाला पाहता हा आकडा कमतरतेचा भासतो. वर्तमानपत्र - टीव्ही पाहण्यास राखीव वेळ ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. पण इंटरनेटबाबत तसे होताना दिसत नाही. वेळ मिळाला तर नेटकडे जाण्याचा बहुतांश लोकांचा कल दिसतो. त्यात बदल झाल्यास डिजिटल मीडियाही मुख्य प्रवाहात येईल.
 
विश्वासार्हतेबाबत डिजिटल मीडिया मागे
माध्यमतज्ज्ञांच्या मते, ‘मीडिया’ म्हणून परिणामकता साधण्यासाठी विश्वासार्हतेच्या मुद्दय़ावर डिजिटल मीडियाला जोर द्यावा लागेल. वर्तमानपत्र-टीव्हीवरून जे प्रसारित होते त्या माहितीला त्या माध्यमाच्या विश्वासार्हतेचे कवच लाभलेले असते. या मुद्दय़ावर डिजिटल मीडिया चाचपडताना दिसतो. डिजिटल मीडियाचा भाग असलेल्या सोशल मीडियावर ‘माहितीची सतत्या तपासण्यापेक्षा, अर्धवट माहितीच्या आधारे मत बनवून तेच मत माहिती म्हणून’ सादर करण्याचा घातक प्रकार फोफावलेला दिसतो. परिणामी, चुकीची, खोटी माहिती लोकांर्पयत प्रसारित होत असते. यातून समाजविघातक घटना झाल्याचीही नोंद आहे. 
 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या वापरावर जोर दिला होता. मात्र, युझरची संख्या आणि वापरण्याचा पॅटर्न पाहता ते तथ्यहीन दिसते.

Web Title: Digital Media travel still on the Slow track!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.