मुंबई - तुमचे दस्तऐवज तुम्हाला कायमस्वरूपी जतन करायचे असतील तर एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. ‘डिजिलॉकर’ या सरकारच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्हाला दस्तऐवज डिजिटल करता येतील. त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. तसेच शासकीय विभागांकडे करावयाचे अनेक प्रकारचे अर्जही येथे उपलब्ध आहेत.
‘डिजिलॉकर’ हा केंद्र सरकारने सुरू केलेला एक डिजिटल दस्तऐवज साठवण आणि पडताळणी प्लॅटफॉर्म आहे. भारतीयांना त्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची डिजिटल प्रत सुरक्षितपणे साठवण्यासाठी आणि वापरण्यासाठीची ही सुविधा आहे. आता राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने डिजिलॉकरवर १०० प्रकारचे दस्तऐवज डिजिटलाइज्ड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा मोफत आहे. सरकारच्या अनेक सेवा ऑनलाइन घेण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.
प्लॅटफॉर्मद्वारे काय मिळेल?क्लाउड स्टोरेज : प्रत्येक वापरकर्त्यास त्यांच्या कागदपत्रांसाठी सुरक्षित क्लाउड साठवण सुविधा मिळते.जारी केलेले दस्तऐवज : आधार, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, गुणपत्रिका आदी कागदपत्रे मिळवता येतात.ई-स्वाक्षरी (e-Sign): दस्तऐवज डिजिटल स्वाक्षरी करून सुरक्षितपणे शेअर करता येतात.सुरक्षित प्रवेश : आधारवर वापरून लॉगिन करता येते.शेअरिंग : दस्तऐवज सुरक्षित लिंकमधून इतर व्यक्ती किंवा संस्थांशी शेअर करता येतात.
डिजिलॉकरवर राज्याने पुरविलेल्या सुविधावयाचा दाखला, डोमिसाईल, कृषी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ॲफेडेव्हीटसोबत अटेस्टेशन, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रमाणित प्रत, आयकर प्रमाणपत्र, भूमिहीन मजुराचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, सांस्कृतिक विभागाची परवानगी, औद्योगिक वापरासाठी खोदकाम करण्याची परवानगी, सॉलव्हन्सी प्रमाणपत्र, मायग्रेशन प्रमाणपत्र, कारखान्याच्या परवानासाठीचा अर्ज, खुल्या जागेवर आयोजित कार्यक्रमासाठीचा अर्ज, बारचा परवाना, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र, अर्थकुटुंब साहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजना, लिफ्ट वापरासाठीचा परवाना, दुकाने आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांच्या परवाना नूतनीकरणासाठीचा अर्ज आदी १०० सुविधा डिजिलॉकरवर राज्य सरकारने पुरविल्या आहेत.
डिजिलॉकर वापरण्याची प्रक्रियाhttps://www.digilocker.gov.in या वेबसाइटला भेट द्या किंवा मोबाइल ॲप डाउनलोड करा.आधार क्रमांक किंवा मोबाइल नंबर वापरून साइन अप करा.आपला आधार क्रमांक लिंक करून सरकारी विभागांनी दिलेली कागदपत्रे मिळवा.तुमची स्वतःची स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करून सुरक्षित ठेवा.