शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच पदवीबाबत दोन विद्यापीठांत मतभेद

By admin | Updated: September 12, 2014 00:46 IST

एकाच पदवीबाबत दोन विद्यापीठांत मतभेद असल्याची बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका प्रकरणामुळे पुढे आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एम.एस्सी.

हायकोर्टातील प्रकरण : विद्यार्थिनीचा प्रवेश स्थानांतरितनागपूर : एकाच पदवीबाबत दोन विद्यापीठांत मतभेद असल्याची बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका प्रकरणामुळे पुढे आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एम.एस्सी. (आयटी) पदवी एम.टेक़ (कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता आवश्यक पात्रता नाही. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मात्र याउलट निकष आहे. परिणामी एका विद्यार्थिनीला नागपूर विद्यापीठातून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्थानांतरित करण्यात आले आहे. पूनम मकेश्वर असे विद्यार्थिनीचे नाव आहे. पूनमने एम.एस्सी. (आयटी) पदवी मिळविल्यानंतर ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण केली. तिला २०१३-१४ शैक्षणिक वर्षामध्ये केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार महागाव येथील तुळशीराम गायकवाड पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात एम.टेक़ (कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात आला. यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वरील निकषाप्रमाणे पूनमचा प्रवेश रद्द केला. याविरुद्ध तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नागपूर विद्यापीठाने प्रवेश वैध ठरवावा किंवा प्रवेश वैध ठरेल अशा दुसऱ्या महाविद्यालयात स्थानांतरित करण्यात यावे अशी विनंती तिने केली होती. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम.टेक़ (कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता एम.एस्सी. (आयटी) पदवी वैध समजली जाते. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने पूनमला जळगाव येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये एम.टेक़ (कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश देण्याचे निर्देश दिलेत. हे महाविद्यालय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित आहे. तंत्रशिक्षण संचालकांनी पूनमच्या स्थानांतरणास सहमती दर्शविली.(प्रतिनिधी)