शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सॅटेलाइट राॅकेट बूस्टरचे भाग भारतात पडले की पाडले? आकाशातून अग्निगाेळे पडण्याच्या घटनेचे रहस्य कायम : तज्ज्ञांचे दावे, प्रतिदावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 09:06 IST

Nagpur News: शनिवारी रात्री महाराष्ट्राच्या विविध भागात अग्निवर्षाव किंवा लाल रंगाच्या वस्तू पडण्याच्या घटनेचे रहस्य कायम आहे. हे पार्ट न्यूझीलंडद्वारे अवकाशात साेडलेल्या उपग्रहाच्या राॅकेट बूस्टरचे असल्याचा दावा केला जात आहे.

- निशांत वानखेडे नागपूर - शनिवारी रात्री महाराष्ट्राच्या विविध भागात अग्निवर्षाव किंवा लाल रंगाच्या वस्तू पडण्याच्या घटनेचे रहस्य कायम आहे. हे पार्ट न्यूझीलंडद्वारे अवकाशात साेडलेल्या उपग्रहाच्या राॅकेट बूस्टरचे असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे अंतराळात सैरभैर फिरत असलेल्या उपग्रहांचे तुकडे असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. उपग्रहाचे तुकडे आहेत की विदेशी देशांनी भारताला लक्ष्य करण्यासाठी केलेली कूटमोहीम, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.

नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, जालना आदी जिल्ह्यात शनिवारी रात्री आठच्या सुमारास आकाशातून अग्निवर्षाव हाेताना अनेकांनी पाहिले. त्यावेळी हा उल्कावर्षाव असल्याचा अनेकांचा समज झाला. मात्र लाल रंगाच्या तप्त वस्तू पडल्याची माहिती समाेर आल्याने त्याचे गूढ वाढले. चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाहीच्या लाडबाेरीत रात्री ७.४५ वाजता एक लाल रंगाची वस्तू पडल्याचे अनेकांनी पाहिले. ही धातूची रिंग हाेती. सध्या ती स्थानिक पाेलीस स्टेशनला जमा आहे. तर रविवारी वर्धा जिल्ह्यातील वाघाेडा येथे आकाशातून पडलेल्या धातूचा गाेळा आढळून आला. त्यामुळे हा उल्कावर्षाव नसून मानवी उपग्रह किंवा राॅकेटचे भाग असण्याच्या दाव्याला दुजाेरा मिळाला आहे.

न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरून राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेटद्वारे ब्लॅकस्काय उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या ‘इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बूस्टर’चेच भाग असावेत, असा दावा एमजीएम अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला. दुसरीकडे अंतराळात भटकत असलेल्या जुन्या उपग्रहाचे तुकडे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येऊन खाली काेसळल्याचा अंदाज खगाेल अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी व्यक्त केला.    

काय असताे राॅकेट बूस्टर काेणताही उपग्रह अंतराळात साेडताना मल्टिस्टेज प्रक्रिया अवलंबली जाते. लाॅन्चिंग स्टेशन समुद्रकाठावर असते कारण एखादी दुर्घटना घडली तर त्याचे अवशेष समुद्रात पडावे. पहिल्या स्टेजमध्ये राॅकेट बूस्टर उपग्रहाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विराेधात बाहेर नेऊन कक्षेत स्थापन करताे आणि मुख्य युनिटपासून वेगळा हाेताे. या प्रकारात ताे भारतावरच्या मार्गाने निघाला आणि उपग्रहाला कक्षेत स्थापन करून पुन्हा गुरुत्वाकर्षणाने इकडे पडला असल्याची शक्यता रामन विज्ञान केंद्राचे खगाेल शिक्षक महेंद्र वाघ यांनी व्यक्त केली.  ...तो तर चीनच्या उपग्रहाचा तुटलेला भाग पुणे : विदर्भ व मराठवाड्यात आकाशातून कोसळलेला भाग धातूची तबकडी किंवा उल्कापात नाही, तर चीनमधील उपग्रहाचा कोसळलेला भाग असल्याचे खगोलशास्त्र अभ्यासकांनी सांगितले. मुंबई येथील नेहरू तारांगण संस्थेचे संचालक अरविंद परांजपे म्हणाले, महाराष्ट्रात काही भागांत चीनने आकाशात सोडलेल्या उपग्रहाचे तुकडे पडले आहेत. उपग्रहाचा काही भाग कोसळल्यानंतर त्याची दिशा भरकटली. पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर त्याचा वातावरणातील घटकांशी संपर्क आला. उपग्रहाच्या तुकड्याचे  तापमान वाढल्याने त्याने पेट घेतला. उर्वरित अवशेष जमिनीवर कोसळले आहेत.  खगोलशास्त्राचे अभ्यासक प्रकाश तुपे म्हणाले, महाराष्ट्रात काही ठिकाणी पडलेले धातूचे तुकडे म्हणजे चीनने आकाशात पाठवलेल्या उपग्रहाच्या तिसऱ्या टप्प्यातील रॉकेटचे तुकडे आहेत. या उल्का किंवा उपग्रहाचा भाग नाही. ते रॉकेटचे तुकडे असून जमिनीवर आकाशातून हळूहळू आले आहेत. त्यामुळे ते सुमारे तीन ते पाच मिनिटे दिसून आले. चीनच्या उपग्रहाच्या तिसऱ्या टप्प्यातील रॉकेटचा काही भाग गुजरात, मराठवाडा व विदर्भ या परिसरात कोसळणार होता, असे चीनच्या शास्त्रज्ञांनी सांगितले होते. त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र