शिवसेनेला आता जाग आली का?

By Admin | Updated: February 10, 2017 01:31 IST2017-02-10T01:31:44+5:302017-02-10T01:31:44+5:30

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन देऊन राज्यात सत्तेत आलेल्या शिवसेनेला दोन वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर शेतकरी कर्जमाफीची आठवण झाली

Did the Shiv Sena wake up now? | शिवसेनेला आता जाग आली का?

शिवसेनेला आता जाग आली का?

मुंबई : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन देऊन राज्यात सत्तेत आलेल्या शिवसेनेला दोन वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर शेतकरी कर्जमाफीची आठवण झाली. काँग्रेस पक्षाने कर्जमाफीची मागणी केल्यानंतर शिवसेनेला आता जाग आली का, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केलाआहे.
गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस पक्ष सातत्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करत आहे. विधानसभा आणि संसदेत कर्जमाफीची मागणी लावून धरली, पण भाजपाने राज्यात सत्ता असूनही कर्जमाफी दिलेली नाही. मात्र, उत्तर प्रदेशात आश्वासन दिले आहे.

Web Title: Did the Shiv Sena wake up now?