शौचास जाणा-या तरुणावर बिबटयाचा हल्ला

By Admin | Updated: June 21, 2016 12:31 IST2016-06-21T12:08:05+5:302016-06-21T12:31:20+5:30

वाहेगाव भरवस येथे सकाळी 6.30 दरम्यान मार्तंड वसंत डुंबरे बाहेर शौचास गेलेला असताना बिबट्याच्या हल्ल्यात गँभिर जखमी झाला.

Dibatai attack on a young goon | शौचास जाणा-या तरुणावर बिबटयाचा हल्ला

शौचास जाणा-या तरुणावर बिबटयाचा हल्ला

ऑनलाइन लोकमत 

लासलगाव, दि. २१-  येथुन पंधरा किलोमीटर अंतरावरील  वाहेगाव भरवस येथील मार्तंड वसंत डुंबरे (२७)  या युवकाला मंगळवारी सकाळी शौचास  जात असताना शेतात दबा धरून बसलेल्या  बिबट्याने जोरदारपणे कमरेवर चावा घेतल्याने त्यास तातडीने गंभीर जखमी अवस्थेत नासिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
वाहेगाव भरवस येथे  सकाळी 6.30 दरम्यान मार्तंड वसंत डुंबरे बाहेर शौचास गेलेला असताना बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर तातडीने भरवस फाटा येथील डॉ. राजेंद्र नागरे यांनी प्राथमिक उपचार केले व त्यानंतर निफाडचे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येऊन त्यास तातडीने नासिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या बिबट्याच्या हल्ल्याने देवगाव व भरवस फाटा परीसरातील शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. वनखात्याने तातडीने पिंजरे लावुन या नरभक्षक बिबट्याला पिंज-यात पकडण्यात यावे अशी मागणी केली आहे.
 

Web Title: Dibatai attack on a young goon