डायलेसिसचे उपचार केवळ 200 रुपयांत
By Admin | Updated: August 17, 2014 02:06 IST2014-08-17T02:06:30+5:302014-08-17T02:06:30+5:30
कळवा रुग्णालयात सुरू असलेले डायलेसिस सेंटर आता ठाणो महापालिका शहरात पाच ठिकाणी सुरू करणार आहे.

डायलेसिसचे उपचार केवळ 200 रुपयांत
>ठाणो : कळवा रुग्णालयात सुरू असलेले डायलेसिस सेंटर आता ठाणो महापालिका शहरात पाच ठिकाणी सुरू करणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला असून ठाण्यासह जिल्ह्यातून येणा:या रुग्णांना केवळ 2क्क् रुपयांत उपचार करणो शक्य होणार आहे. विशेष म्हणजे हे काम सामाजिक संस्थांकरवी केले जाणार असून रुग्णांकडून अधिकची रक्कम घेतल्यास संस्थेची निवड रद्द केली जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी कळवा रुग्णालयात सुरू असलेल्या डायलेसिस सेंटरच्या लुटीचे प्रकार स्थायी समितीत उघड झाले होते. या ठिकाणी 7क्क् ते 8क्क् रुपये असताना रुग्णांकडून 17क्क् ते 18क्क् रुपये घेतले जात असल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे महापालिकेने स्वत: डायलेसिस सेंटर सुरू करून रुग्णांना स्वस्तात उपचार मिळवून द्यावेत, अशी मागणी सदस्यांनी केली होती. त्यानंतर महापालिकेने शहरात पाच ठिकाणी डायलेसिस सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या ठिकाणी उपचारासाठी येणा:या रुग्णांकडून केवळ 2क्क् रुपये आकारले जाणार आहेत. इतर खर्च महापालिका उचलणार आहे. सामाजिक संस्थांना हे सेंटर सुरू करण्यासाठी देणार आहे.
प्रत्येक डायलेसिस सुविधेसाठी किमान 15क्क् ते 25क्क् क्षेत्रफळाची जागा सामाजिक संस्थांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डायलेसिसच्या मशिन्स नादुरुस्त झाल्यास त्या बदलून देण्याची जबाबदारी महापालिका
घेणार आहे.
च्कळवा रुग्णालयातील डायलेसिस सेंटरच्या लुटीचे प्रकार स्थायी समितीत उघड झाले होते. या ठिकाणी 7क्क् ते 8क्क् ऐवजी रुग्णांकडून 17क्क् ते 18क्क् रुपये घेतल्याचे उघड झाले होते.