धुळे एकाच दिवसात ९३ कोरोना रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 20:28 IST2021-02-25T20:27:58+5:302021-02-25T20:28:15+5:30
जिल्ह्यात गुरुवारी तपासणीसाठी आलेल्या अहवालांपैकी एकूण ९३ रुग्णांचे अहवाल पाॉझिटिव्ह आले आहे.

धुळे एकाच दिवसात ९३ कोरोना रुग्ण आढळले
धुळे- जिल्ह्यात गुरुवारी तपासणीसाठी आलेल्या अहवालांपैकी एकूण ९३ रुग्णांचे अहवाल पाॉझिटिव्ह आले आहे. त्यात सर्वात जास्त धुळे महानगरात ८५ रुग्ण आढळून आले आहे. त्यात जयहिंद हायस्कूलमधील १५ शिक्षक पाॉझिटिव्ह निघाले आहेत. दरम्यान, शहरातील नागरिकांनी मास्क वापरावे आणि गर्दी करु नये यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत आणि मनपा आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणी जाऊन मास्क न वापरणाऱ्या वृद्ध नागरिक आणि तरुणांना मास्क वाटप केले आणि मास्क वापरण्यासंदर्भात प्रबोधन केले. अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरही शहरात बहुतांश भागात विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसली नाही.