शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

कौटुंबिक वाद आला राजकारणात, दिराला भावजयीने दिले आव्हान; वंचितनेही भरले रंग...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 8:30 AM

काँटे की टक्कर, २००४ सालच्या विधानसभेला डॉ.पद्मसिंह पाटील यांना त्यांचे चुलतबंधू पवनराजे यांनी तगडी लढत दिली होती

चेतन धनुरे

धाराशिव : विधानसभा असो की लोकसभा उस्मानाबाद मतदारसंघात  मागच्या २० वर्षांपासून पाटील-राजेनिंबाळकर घराण्यातच फाईट झाली आहे. दोन पिढ्यांपासून भावाभावातील लढतीच्या डिट्टो फिल्मी क्लायमॅक्समध्ये यंदा ऐनवेळी ट्वीस्ट आला अन् भाऊ विरुद्ध भाऊ ऐवजी दीर-भावजयीत लढतीची पटकथा लिहिली जातेय.

२००४ सालच्या विधानसभेला डॉ.पद्मसिंह पाटील यांना त्यांचे चुलतबंधू पवनराजे यांनी तगडी लढत दिली होती. या दोघांतील कौटुंबिक, राजकीय कलहाचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीतील राणाजगजितसिंह पाटील व ओम राजेनिंबाळकर यांनी आजवर कायम राखला. आता यावेळी मात्र, ओमराजेंना राणा यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आव्हान दिले आहे. आजवरचा इतिहास पाहता ही लढत पुन्हा एकदा अत्युच्च टोकाची होण्याची चिन्हे असून, वंचित बहुजन आघाडीमुळे यात भर पडली आहे. यंदाचा पराभव कोण्या एकाला विजनवासात घेऊन जाणारा असल्याने दोन्हीकडे जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. 

फोन अन् कामांवरुन आरोप-प्रत्यारोपांची राळमहायुतीकडे लोकसभा क्षेत्रातील सहापैकी पाच आमदार आहेत. मदतीला माजी मंत्रीही आहेत. खा.ओमराजे यांची भिस्त ही एक आमदार, तीन माजी आमदार व कार्यकर्त्यांवर आहे. महायुतीकडून खासदारांची कामे काय असतात, त्यांनी पाच वर्षांत काहीच केले नाही, मोदींमुळे मतदारसंघातील कामे मार्गी लागल्याचे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. तर ओमराजेही आपण प्रत्येक व्यक्तीचे फोन घेऊन त्यांची कामे करतो असे सांगतानाच केलेल्या कामांची यादी सभांमधून वाचत आहेत. कामांवरुन होणारे आरोप-प्रत्यारोप आता वैयक्तिक पातळीवर पाझरु लागले आहेत. दुसरीकडे वंचितचे उमेदवार आंधळकर दोघांवरही घराणेशाहीचा आरोप करीत दंड थोपटून उभे आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

मी सर्वांचेच फोन उचलतो, कामे करतो, असा दावा खा. ओमराजे करतात. तर विरोधक खासदारांना विकास कामांवरुन प्रश्न उपस्थित करतात.कृष्णेचे पाणी, तुळजापूर रेल्वे, उद्योग, बेरोजगारी, शेतमालाचे भाव, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, रस्त्यांचे जाळे, कृषी सिंचन, सौर उर्जा.घराणेशाही तसेच संपत्तीवरुन उमेदवारांत होणारे आरोप-प्रत्यारोप, कमिशन-हप्ता वसुलीचाही होतोय सातत्याने आरोप.

गटातटाचा काय होणार परिणाम? महायुतीत जागा अजित पवार गटाला सुटल्याने शिंदेसेना नाराज आहे. त्यांचे पदाधिकारी प्रचारात कितपत सक्रीय होतात, यावर बरीच भिस्त आहे.  महाविकास आघाडीत गटबाजी दिसत नाही. मात्र, उद्धवसेना विश्वासात घेत नसल्याची खंत मित्रपक्ष खासगीत सांगतात. 

२०१९ मध्ये काय घडले?ओम राजेनिंबाळकर    शिवसेना (विजयी)    ५,९६,६४० राणा पाटील    राष्ट्रवादी काँग्रेस    ४,६९,०७४ अर्जुन सलगर    वंचित बहुजन आघाडी    ९८,५७९नोटा    -    १०,०२४   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४osmanabad-pcउस्मानाबादbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४