शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

धनंजय मुंडे यांचा आधीच राजीनामा व्हायला पाहिजे होता; पंकजा मुंडेंची आली प्रतिक्रिया, देशमुख कुटुंबाची मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:20 IST

Pankaja Munde on Dhananjay Munde resign: काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांनी देशमुख प्रकरणावर विचारले असता पंकजा यांनी पुण्याच्या दौऱ्यावर असल्याने पुण्याबाबत विचारा, असे सांगत विषय टाळला होता.

चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आली आहे. काल काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येचे ते व्हिडिओ होते. ते व्हिडिओ उघडून पाहण्याची सुद्धा माझी हिम्मत झाली नाही. या प्रकरणातल्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हीच माझी मागणी आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे स्वागत आहे. पण हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. राजीनामा घेणाऱ्यांनी सुद्धा आधीच राजीनामा घ्यायला पाहिजे होता, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. एकप्रकारे पंकजा यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. 

ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ बनविला आहे. हे व्हिडिओ बघण्याची सुद्धा माझी हिम्मत झाली नाही. या हत्येमध्ये कोण इनवॉल आहे? कोणाकोणाचा हात आहे? हे फक्त तपास यंत्रणांना माहीत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं, त्यात मी माझी भूमिका मांडली होती. यामुळे मी यात हस्तक्षेप करण्याचा काही संबंध नाही. ज्या मुलांनी ही हत्या केलेली आहे, त्या मुलांमुळे संपूर्ण राज्यातील समाज ज्यांचा कुठलाही दोष नाही, त्यांची बदनामी झाली आहे. संतोष देशमुख यांचा समाज सुद्धा आक्रोशात वावरत आहे. आपल्या राज्यात कुठलीही गोष्ट जातीवर जाते. अमानुषपणे एखाद्याला संपवणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या लोकांना कुठलीही जात नसते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

गुन्हेगारांना जशी कुठली जात नसते तशीच राजकारण्यांना सुद्धा कुठली जात नसते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी आमदारकीची  शपथ घेतली, तेव्हाच कोणाबद्दल आक्रोश बाळगणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे याही प्रकरणात कुठलाही जातीवाद होण्याचा प्रयत्न होऊ नये. मी संतोष देशमुख यांच्या आईची आणि कुटुंबीयांची हात जोडून माफी मागते, असे आज पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

पुण्यात बोलण्यास नकार, नागपूरमध्ये बोलल्या...

काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांनी देशमुख प्रकरणावर विचारले असता पंकजा यांनी पुण्याच्या दौऱ्यावर असल्याने पुण्याबाबत विचारा, असे सांगत विषय टाळला होता. तसेच संतोष देशमुख भाजपचेच होते, तरीही पंकजा या त्यांच्या घरी सांत्वनासाठी अद्यापपर्यंत गेल्या नाहीत. यावरूनही त्यांच्यावर विरोधक टीका करत होते. भाजपचेच आमदार सुरेश धस यांनीही टीका केली होती. आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यावर पंकजा मुंडे यांनी नागपूरमध्ये असूनही यावर बोलल्या आहेत. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBJPभाजपा