शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'जनतेचं घेण-देण नाही; मुख्यमंत्र्यांना फक्त निवडणूक जिंकायची'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 18:00 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्यातील जनतेबाबत कळवळा नाही का ? त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत का? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला.

मुंबई - बुधवारी रात्री पुण्यामध्ये अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, शहरात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीत गेले आहेत. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. राज्यातील जनतेने 'या' सरकारचे काय घोडे मारले आहे हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे अशी खोचक टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्यातील जनतेबाबत कळवळा नाही का ? त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत का? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, पुण्यात प्रचंड पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर ११ लोकांचा मृत्यू झाला असून, राज्याचे मुख्यमंत्री मात्र दिल्लीत बसले असल्याचा आरोप सुद्धा मुंडे यांनी केला.

तर पश्चिम महाराष्ट्राच्या पूरपरिस्थितीच्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हेच केले होते. राज्यातील जनतेने भाजप सरकारचे काय घोडे मारले आहे. असा प्रश्न उपस्थित करत मुंडे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. पुणे व परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भिषण परिस्थिती निर्माण झाली असताना तेथील नागरिकांना मदत  करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना निवडणूकांची काळजी असल्याचा आरोप सुद्धा मुंडे यांनी यावेळी केला.