शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

'...तर मी राजीनामा देईन'; धनंजय मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:35 IST

महायुतीतील आमदारांसह विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली. 

Dhananjay munde on resign: संतोष देशमुख हत्या आणि दोन कोटींच्या खंडणी प्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येचे प्रकरण समोर आल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी राजीनाम्याच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात ढकलला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याशी संबंधित प्रश्नासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

आमदार संदीप क्षीरसागर म्हणताहेत की, वाल्मीक कराडच्या जवळचे आहात. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या जवळचे आहात, त्यामुळे तुमचा राजीनामा होणार नाही, असा प्रश्न धनंजय मुंडेंना विचारण्यात आला.

धनंजय मुंडेंनी राजीनाम्याच्या मागणीवर मांडली भूमिका

कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, "याबाबतीत धनंजय मुंडे यासर्व गोष्टींमध्ये मुख्यमंत्र्यांना (देवेंद्र फडणवीस), उपमुख्यमंत्र्यांना (अजित पवार) कुठे जर दोषी वाटत असतील, तर त्यांनी राजीनामा मागावा; मी राजीनामा देणार. पण, फक्त हा विषय काढून राजीनामा होत असेल, याबाबतीत मी दोषी आहे की नाही; हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगू शकतील. त्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे ना", अशी भूमिका धनंजय मुंडेंनी मांडली. 

"51 दिवस... ज्या पद्धतीने ट्रायल सुरू आहे. टार्गेट मी आहे. मी पक्षाचा निष्ठावंत आहे. महायुतीच्या प्रचारातील प्रमुख व्यक्ती आहे. आपण निवडणुकीत टीका करतो. टीका सहनही करतो. पण, याबद्दलचा राग पुन्हा नसतो", असे धनंजय मुंडे म्हणाले. 

वरिष्ठांनी मला सांगावं -धनंजय मुंडे

नैतिकता म्हणून राजीनामा देऊन चौकशी होईपर्यंत बाजूला राहायला पाहिजे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, "माझी नैतिकता माझ्या लोकांच्याबद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडलीये, त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय, ते अतिशय प्रामाणिक आहे. त्यामुळे मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही. त्यामुळे माझा दोष सांगावा लागेल. माझ्या वरिष्ठांनी सांगावा लागेल. तेच माझं म्हणणं आहे", असे भाष्य धनंजय मुंडे यांनी केले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार