शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पंकजाताईंकडून दिवळीच्या शुभेच्छा आल्या का? भाऊ धनंजय म्हणतात…

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 17:56 IST

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले.

बारामती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदाबाग या निवासस्थान दरवर्षी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी राज्यातील विविध ठिकाणावरुन राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते पवार कुटुंबाची भेट घेण्यासाठी येत असतात. यंदाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते गोविंदबाग येथे आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंनापंकजा मुंडेंकडून शुभेच्छा आल्या का ? असा प्रश्न विचारला,त्यावर धनंजय मुंडेंनी माध्यम प्रतिनिधींची चांगलीच फिरकी घेतली.

शुभेच्छा आल्या नाहीतशरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्रितपणे बारामतीत दरवर्षी दिवाळीचा सण साजरा करतात आणि पाडव्याला सर्व हितचिंतकांच्या स्नेहभेटी घेतात. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही बारामतीमध्ये येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मीडियाशी बोलताना पंकजा मुंडेंकडून शुभेच्छा आल्या का ? या प्रश्नावर म्हणाले की, पंकजाताईंकडून अद्याप तरी दिवाळीच्या शुभेच्छा आलेल्या नाहीत, तुमच्याकडे आल्या असतील तर मला सांगा, अशी फिरकी त्यांनी घेतली.

शरद पवारांर वैयक्तिक हल्लेमुंडे पुढे म्हणाले की, शरद पवार हे शक्तीपीठ आहे. त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आम्ही तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही पवारसाहेबांवर होणारे वैयक्तिक हल्ले रोखू. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात पण खालच्या पातळीला जाऊन ते आरोप प्रत्यारोप होऊ नयेत, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

गोविंदबागेत अजितदादांची अनुपस्थितीदरवर्षी प्रमाणे यंदाही बारामतीच्या गोविंदबागेत पवार कुटुंबियांनी हितचिंतकांच्या स्नेहभेटी घेतल्या. दिवाळी पाडव्याच्या संपूर्ण दिवशी हा कार्यक्रम रंगतो. राज्यभरातून विविध नेते, खासदार-आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते गोविंदबागेकडे कूच करत असतात. पण या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीबाबत स्वतः शरद पवार यांनी खुलासा केला. अजित पवारांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे, खबरदारी म्हणून अजित पवार आले नाही, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPankaja Mundeपंकजा मुंडे