हिंदु राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईला अटक
By Admin | Updated: June 10, 2014 21:54 IST2014-06-10T21:54:39+5:302014-06-10T21:54:39+5:30
हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. फेसबुकवरील महापुरूषांच्या बदनामीकारक मजकूरा प्रकरणी पुण्यात वातावरण तापले होते.

हिंदु राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईला अटक
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १० - हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. फेसबुकवरील महापुरूषांच्या बदनामीकारक मजकूराप्रकरणी पुण्यात वातावरण तापले होते. मोहसीन शेख हा कामातून घरी येत असताना हडपसर येथे त्याला अडवून मारहाण करण्यात आली होती. त्यात मोहसीनचा मृत्यू झाल्याने वातावरण चिघळले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी धनंजय देसाईला अटक केली आहे. मोहसीन हा मुळचा सोलापुरचा होता व पुण्यात नोकरी निमित्त राहत होता. या प्रकरणाचा मोहसीनशी काही एक संबंध नव्हता.