हडपसरमधील खुनप्रकरणी धनंजय देसाईला अटक

By Admin | Updated: June 10, 2014 23:52 IST2014-06-10T22:40:51+5:302014-06-10T23:52:21+5:30

हडपसर येथे एका तरूणाचा खुन केल्याच्या प्रकरणात हिंदुराष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला अटक करण्यात आली आहे.

Dhananjay Desai arrested in the murder of Hadapsar | हडपसरमधील खुनप्रकरणी धनंजय देसाईला अटक

हडपसरमधील खुनप्रकरणी धनंजय देसाईला अटक

पुणे : फेसबुकवरून महापुरूषांची बदनामी केल्यानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर हडपसर येथे एका तरूणाचा खुन केल्याच्या प्रकरणात हिंदुराष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला अटक करण्यात आली आहे. देसाईसह दोघांना अटक करण्यात आल्याने या गुन्‘ातील आरोपींची संख्या २१ झाली आहे.
मूळचा सोलापूरचा असणार्‍या एका आयटी इंजिनिअर असलेल्या तरूणाचा हडपसर येथे खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत हिंदुराष्ट्र सेनेच्या १९ जणांना अटक केली आहे. त्यांना १२ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हिंदुराष्ट्र सेनेचा प्रमुख असलेल्या धनंजय देसाई याला अटक करण्यास न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर त्याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. धार्मिक तेढ निर्माण करणारी पत्रके वाटल्याप्रकरणी देसाई याला यापूर्वीच लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. लोणी काळभोरच्या गुन्‘ातून त्याला हडपसरच्या गुन्हयात वर्ग करण्यात आले आहे.

Web Title: Dhananjay Desai arrested in the murder of Hadapsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.