शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणावरून परिषदेत गदारोळ

By admin | Updated: December 19, 2014 02:46 IST

काँग्रेसचे रामहरी रूपनवार, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, रामराव वडकुते यांच्यासह १२ सदस्यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला.

नागपूर : धनगर आरक्षणाचा मुद्दा गुरुवारी विधान परिषदेत चांगलाच गाजला. सत्तेत आल्यावर एक महिन्यात आरक्षण देऊ, अशी घोषणा करणारे सरकार आता शब्द पाळत नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभागृहात सरकारविरोधात घोषणा दिल्या तर सरकार धनगरांच्या बाजूने भक्कमपणे उभे असून आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. या प्रश्नावर झालेल्या गदारोळामुळे तालिका सभापतींना दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले.काँग्रेसचे रामहरी रूपनवार, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, रामराव वडकुते यांच्यासह १२ सदस्यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी रामहरी रूपनवार यांनी केली तर सरकार एक महिन्यात निर्णय घेणार होते त्याचे काय झाले, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. यावर निवेदन करताना आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आरक्षणाचा मुद्दा साफ फेटाळून लावला. मंत्र्यांच्या उत्तराने राष्ट्रवादीचे सदस्य चांगलेच संतापले. आरक्षणासाठी बारामती येथे झालेल्या आंदोलनाची आठवण रामराजे निंबाळकर यांनी करून दिली. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान या मुद्यावर सरकारची कोंडी होत असल्याचे दिसताच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारची बाजू मांडली. आरक्षणाच्या बाबतीत घाईघाईने घेतलेले निर्णय अंगलट येतात हे गत आघाडी सरकारने मराठा आणि मुस्लीम आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भात एक समिती स्थापन केली जाईल व त्याचा अहवाल आल्यावर ठराव करून केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल, अशी घोषणा खडसे यांनी केली. मात्र राष्ट्रवादीच्या सदस्यांचे यावर समाधान झाले नाही. सभापतींच्या आसनापुढे येत त्यांनी घोषणा दिल्याने प्रथम १० मिनिटांसाठी व नंतर ८ मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. गोंधळातच लक्षवेधी संपल्याची घोषणा तालिका सभापतींनी केली.(प्रतिनिधी)