शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

धावपट्टी न दिसल्याने पहिल्यांदा 'गो-अराउंड', दुसऱ्या प्रयत्नात घात; बारामती विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 08:19 IST

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत DGCA कडून सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Ajit Pawar Died in Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात निधन जालं. निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवारबारामतीला येत होते. मात्र विमान उतरत असतानाच ते कोसळले आणि स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार यांच्यावर आज बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार होणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने आता हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती दिली आहे.

बारामती येथील विमानतळावर बुधवारी सकाळी ८.४३ च्या सुमारास विमानाचा अपघात घडला. लँडिंगच्या प्रयत्नात असताना VT-SSK हे विमान धावपट्टीच्या कडेला कोसळले आणि विमानाला आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घेतले आहे. मात्र आगीचे लोळ प्रचंड असल्याने कोणीही वाचू शकले नाही.

नेमका घटनाक्रम काय?

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने माहितीनुसार आणि एटीसीकडून प्राप्त झालेल्या विधानानुसार, या अपघाताचा घटनाक्रम समोर आला आहे.

सकाळी ८:१८ वाजता: विमान VT-SSK ने बारामती तळाशी पहिला संपर्क साधला. त्यावेळी विमान बारामतीपासून ३० समुद्री मैल अंतरावर होते. पुणे अप्रोच केंद्राने या विमानाला बारामतीकडे जाण्याची आणि दृश्य हवामान परिस्थितीत उतरण्याची परवानगी दिली होती.

हवामानाची विचारणा: वैमानिकाने बारामती येथील वाऱ्याचा वेग आणि दृश्यमानतेबाबत विचारणा केली. त्यावेळी हवा शांत असून दृश्यमानता साधारण ३००० मीटर असल्याचे त्यांना कळवण्यात आले.

पहिला अयशस्वी प्रयत्न: विमान रनवे ११ च्या अंतिम टप्प्यावर आले होते. मात्र, दृश्यमानता कमी असल्याने वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी 'गो-अराउंड' (पुन्हा हवेत जाण्याचा निर्णय) घेतला.

दुसरा प्रयत्न आणि अपघात: काही वेळातच विमानाने पुन्हा रनवे ११ साठी अप्रोच केला. एटीसीने धावपट्टी दिसत आहे का, याची विचारणा केली असता, सुरुवातीला नकार मिळाला. परंतु, काही सेकंदातच वैमानिकाने "रनवे दिसत आहे" असा संदेश दिला.

सकाळी ८:४३ वाजता: विमानाला रनवे ११ वर उतरण्याची अंतिम परवानगी देण्यात आली. मात्र, वैमानिकाकडून या परवानगीचा कोणताही 'रीडबॅक' (प्रतिसाद) मिळाला नाही.

सकाळी ८:४४ वाजता: अवघ्या एका मिनिटात एटीसी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले की, रनवे ११ च्या थ्रेशोल्डजवळ (धावपट्टीच्या सुरुवातीच्या भागाजवळ) आग लागली आहे.

बचावकार्य आणि तपास

अपघात होताच विमानतळावरील आपत्कालीन सेवा आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. विमानाचा ढिगारा धावपट्टीच्या डाव्या बाजूला विखुरलेला असून विमानाचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एएआयबीने तातडीने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला आहे. एएआयबीचे महासंचालक स्वतः तपासासाठी घटनास्थळी दाखल होत आहेत. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की हवामानातील बदलामुळे, याचा शोध आता घेतला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Plane Crash: Failed Landing, Fatal Second Attempt Details

Web Summary : Ajit Pawar tragically died in a Baramati plane crash during landing. Poor visibility led to a failed first attempt ('go-around'). The second attempt resulted in a fatal crash near the runway. Investigation underway.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामतीPlane Crashविमान दुर्घटनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस