शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबांनी बीडमध्ये नोकरी केल्याचा भक्तांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 05:45 IST

श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरुन पाथरी आणि शिर्डीत वाद सुरू असतानाच आता बीड आणि औरंगाबादजवळील धूपखेडवासियांनी श्रीसाई आमचेही असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे.

बिडकीन (औरंगाबाद)/बीड : श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरुन पाथरी आणि शिर्डीत वाद सुरू असतानाच आता बीड आणि औरंगाबादजवळील धूपखेडवासियांनी श्रीसाई आमचेही असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे. बीडमध्ये सार्इंनी नोकरी केल्याचा दावा करून बीडकरांनी १०० कोटींची, तर आपले गाव सार्इंची प्रगटभूमी असल्याचे सांगून धूपखेडवासियांनी १५० कोटींचा निधी मागितला आहे.बीडचे साईभक्त तथा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. विद्यासागर पाटंगणकर म्हणाले, साईबाबा बीडमध्ये होते असा दास गणू महाराजांच्या साईचरित्रात उल्लेख आहे. मौखिक परंपरेनुसार आमचे वडील जनार्दन महाराज पाटंगणकर सांगत, साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानात कामाला होते. ४ ते ५ वर्र्षे ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते. इंग्रजांनी त्यांचे काम बघून त्यांना एक पगडी भेट देत सत्कार केला होता.तिकडे औरंगाबादजवळील श्रीक्षेत्र धूपखेडा येथील श्री साईबाबा मंदिर संस्थान, श्री साईभक्त मंडळ तसेच ग्रामस्थसुद्धा आक्रमक झाले असून, या ऐतिहासिक क्षेत्राला निधी जवळपास दीडशे कोटी विकास निधी देण्याची मागणी केली आहे. मंगळवारी धूपखेडा येथे श्री साईबाबा मंदिर संस्थान, श्री साईभक्त मंडळ तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही विशेष ग्रामसभा घेण्यात आली. सार्इंची खरी प्रगटभूमी धूपखेडाच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. धूपखेडा येथे मंगळवारी झालेल्या विशेष ग्रामसभेस श्री साईबाबा ज्यांना प्रथम दिसले ‘त्या’ चाँद पटेल यांच्या पाचव्या पिढीचे वंशज चाँद पटेल व बाबूलाल पटेल हेही उपस्थित होते. त्या काळातील चाँद पटेल यांचा चाबूक त्यांनी जपून ठेवला आहे.पाथरीकर मुख्यमंत्र्यांना भेटणार : पाथरी (जि़परभणी) : श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी शिर्डीकरांची भूमिका जाणून घेतली; परंतु, पाथरीकरांना वेळ दिला नाही़ त्यामुळे पाथरीकरांची भूमिका त्यांच्यासमोर स्पष्ट करण्यासाठी लवकरच श्री साईबाबा जन्मस्थळ विकास कृती समितीचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे़ तसा निर्णय मंगळवारी पाथरीत झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला़

टॅग्स :saibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिरMaharashtraमहाराष्ट्र