शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पूरस्थिती आणि धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट, दिली महत्त्वाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 23:38 IST

Maharashtra Rain Update: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पुरस्थिती आणि धरणांमधून होणाऱ्या विसर्गाबाबत ट्विट करून महत्त्वाची माहिती दिली आहे. 

राज्यातील बहुतांश भागांना आज मुसळधार पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे पुणे, कोल्हापूरसह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. मुंबई आणि ठाणे परिसरातही अनेक ठिकाणी पूरस्थितीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पुरस्थिती आणि धरणांमधून होणाऱ्या विसर्गाबाबत ट्विट करून महत्त्वाची माहिती दिली आहे. 

या ट्विटमध्ये माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले की, राज्यात अनेक भागात मोठा पाऊस असल्याने काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. याबाबतीत मी सातत्याने सिंचन विभागाशी संपर्कात असून, सिंचन अधिकार्‍यांना स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

त्यांनी पुढे सांगितले की,  खडकवासलातून 35,300 क्युसेक इतका विसर्ग होत होता. तो आता 40,000 क्युसेक इतका विसर्ग होत आहे. उद्या सकाळी पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. याची संपूर्ण माहिती पुणे महापालिकेला सातत्याने देण्यात येत आहे. कोयनेतून सध्या 20,000 क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, तो पहाटे 3 वाजता 30,000 क्युसेक इतका होईल. सकाळी 9 वाजता तो 40,000 क्युसेक इतका होण्याची शक्यता आहे. सिंचन विभागात सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहे.

या ट्विटमधून कोल्हापूरमधील पुराचं कारण ठरणाऱ्या अलमट्टी धरणातील पाणीपातळीबाबतही फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्र सरकार सातत्याने कर्नाटक सरकारशी संपर्कात आहे. कर्नाटकचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि अलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता यांच्याशी सातत्याने संवाद होतो आहे. 517.5 मीटर इतकी पाणीपातळी (एफआरएल) कायम ठेवण्यास सांगण्यात आले आहे आणि ते कर्नाटक सरकारने मान्य केले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊसfloodपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार