शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीची पाच जणांना धडक; पोलिसही जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 21:04 IST

Devendra Fadnavis's convoy car Accident: गेल्या तीन महिन्यांतील फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीला झालेला हा दुसरा अपघात आहे. 8 जुलैला मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली होती. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर किरकोळ जखमी झाले होते.

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांनी धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाल्याची घटना गडगा-मुखेड रोडवरील बेळी फाटा येथे रविवारी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान घडली.  (Devendra Fadnavis convoy car accident again in three months; five injured in Nanded. )

गेल्या तीन महिन्यांतील फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीला झालेला हा दुसरा अपघात आहे. 8 जुलैला मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली होती. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर किरकोळ जखमी झाले होते. ताफ्यातील एका गाडीने पुढे असणाऱ्या दरेकर यांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले होते. 

आज देवेंद्र फडणवीस हे लातूर, नांदेडच्या दौऱ्यावर होते. बेरळी येथे राजे छत्रपती अकॅडमी जवळ ताफ्यातील वाहनाने एका पोलिसासह दोन मोटरसायकल आणि एका मालवाहू जीपला धडक दिली. जिवीत हानी झालेली नसली तरी पाच जणांनाही दुखापत झाली आहे. गडगा ते मुखेड जाताना अपघात झाला. बालाजी शंकर पवार (वय २६ रा.मांजरी, ता.मुखेड), राजेश व्यंकटराव जाधव (वय ३६, रा.मुखेड), जमादार नामदेव सायबू दोसलवार, समीर भीसे (वय ३७) व अरविंद मोरे (वय ४०) अशी जखमींची नावे आहेत. बेरळी फाट्यावर हा अपघात झाला. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, खासदार प्रताप चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार राम रातोळीकर, माधवराव साठे, बालाजी बच्चेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAccidentअपघात