शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा; 'भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर इतिहासात जावे लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 13:34 IST

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावरून आता राज्यात वाक् युद्ध सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे, अनिल परबांनी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद ...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावरून आता राज्यात वाक् युद्ध सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे, अनिल परबांनी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल कशी निकालाची अर्धवट माहिती दिली ते सांगितले. तसेच नैतिकतेचा मुद्दा धरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी राजीनामा देण्याची मागणी केली. यावर फडणवीस यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे १६ आमदारांच्या अपात्रतेचे सर्व अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. अशा प्रकारे जर स्पिकरवर दबाव आणण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते फ्री आणि फेअर अश्याप्रकारच्या न्यायप्रक्रियेत बसत नाही.  मला वाटत नाही की स्पिकर कोणत्याही दबावाला बळी पडतील. जे कायद्यामध्ये आहे. जे संविधानामध्ये आहे. जे सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निर्णय करतील योग्य सुनावणी करत योग्य तोच निर्णय देतील अशी अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले. 

उध्दव ठाकरे यांना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकार नाहीय. कारण जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडून आले, ज्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी विचार, युती, आणि पक्ष ही सोडला, ते कोणत्या अधिकाराने नैतिकता सांगतात असा सवाल करत फडणवीसांनी शरद पवारांवरही शरसंधान साधले. 

शरद पवार यांचा नैतिकतेच्या संबंध आहे का? जर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर इतिहासात जावे लागेल. वसंत पाटील यांचे सरकार कसे गेली इथं पासून सुरू करावे लागेल, ते जेष्ठ नेते आहेत, समजून घ्यावे, असा इशार फडणवीस यांनी दिला आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे